Mahayuti: राष्ट्रवादीला 40 जगांमध्ये गुंडाळणार? महायुतीत भाजपच 'दादा'; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही महत्त्वाचा निर्णय

Ajit Pawar NCP: छगन भुजबळ यांनी यापूर्वी पक्षाला महायुतीतून किमान 80 मिळायला हव्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटप कसे होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde And Ajit Pawar Of Mahayuti
Devendra Fadnavis, Eknath Shinde And Ajit Pawar Of MahayutiEsakal
Updated on

येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात महायुतीमध्ये भाजपचेच वर्चस्व राहणार असून, ते 288 पैकी 150 हून अधिक जागा लढण्यासाठी आग्रही आहेत, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

या माहितीनुसार भाजपला 150-160 जागा हव्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80-90 जागा मिळण्याची शक्यता आहे. हे आकडे पाहिले तर 288 पैकी फक्त 38 जागा शिल्लक राहतात. त्यामुळे महायुती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 40 जगांच्या आतच गुंडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Maharashtra VidhanSabha Election 2024)

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांनी 105 जागां जिंकल्या होत्या. यासह त्यांना 10 ते 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे 120 जगांवर भाजप नैसर्गिकपणे हक्क सांगणार आहे.

याचबरोबर भाजप आपल्या पारड्यात आणखी 30-40 जागा पाडूण घेण्याच्या तयारीत असून पक्षातील अनेक नेत्यांनी दिडशेहून अधिक जागांसाठी आग्रह धरला आहे.

दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. हे पाऊल उचलत भाजपने पक्षांतर्गत कुरघोड्या थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde And Ajit Pawar Of Mahayuti
Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने केली २५ हजार कोटींची तरतूद, अजित पवारांची माहीती!

शिंदेंनी केली 100 जागांची मागणी

शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना अनपेक्षितपणे राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा पुरेपूर वापर करत पक्ष भक्कम करण्यासाठी अनेक पाऊले उचलली. अशात आता आपल्याबरोबर आलेल्या सर्वांना न्याय देण्यासाठी शिंदे यांनी महायुतीतून 100 जागांची मागणी केली आहे. शिंदेंनी जरी 100 जागांची मागणी केली असली तरी त्यांना 80-90 जागा मिळतील अशी माहिसी साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde And Ajit Pawar Of Mahayuti
Ajit Pawar: पवारांनी विचारला प्रश्न, दादा म्हणाले खासदारांना बोलायचा अधिकारच नाही; नियोजन समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

40 जागांवर राष्ट्रवादीची बोळवण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेले मागणी केलेल्या जांगाची एकून बेरीज 250 होते. अशात 288 पैकी अवघ्या 38 जागाच शिल्लक राहतात. त्यामुळे महायुतीली इतर दोन पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवघ्या 38 ते 40 जागांवर बोळवण करणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी यापूर्वी पक्षाला महायुतीतून किमान 80 मिळायला हव्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटप कसे होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com