मुंबई - विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही तिन्ही पक्षांचे एकमत झाले नसल्याचे चित्र आहे. निकालाच्या तीन दिवसांनंतरही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही..विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, म्हणून जोरदार वातावरणनिर्मिती करत आहेत. काही ठिकाणी शिंदे-फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणूनही बॅनर झळकले आहेत..मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. विधानसभेची मुदत संपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला, त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याचे आदेश राज्यपालांनी आहेत..दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३५ जागांवर विजय मिळवला. यात भाजप १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४१ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे..मुख्यमंत्री कोण होणार, याची घोषणा करण्यात आलेली नसली, तरी युतीमधील दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर दावा करीत आहेत.मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. अजित पवार यांच्या पक्षाने मात्र मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांनाच पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत..फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसची काहीच हरकत असणार नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनीही फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.