Maharashtra- Gujrat : नाशिक जिल्ह्यातील गावांना 'या' कारणामुळे व्हायचयं गुजरातमध्ये सामील

Maharashtra- Gujrat
Maharashtra- Gujrat esakal
Updated on

 विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक :
सीमावर्ती भागातील आमची वाडे- पाडे... राज्य शासनाचा भल्या मोठ्या घोषणा; पण त्या कुणासाठी... शेजारचं राज्य पर्यटन वृद्धीतून आर्थिक समृद्धी मिळविण्यासाठी गावांचा मूलभूत सुविधांसह चेहरा बदलवित आहे अन्‌ आम्ही आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत. दादा मागितली तरी दखल घ्यायची नाही, इलेक्शनपुरता आमची आठवण, नंतर आम्ही उघड्यावर, अशी आमची गत... हे बोल होते गुजरातच्या सीमावर्ती भागात असलेली सुरगाणा तालुक्यातील गाव-पाड्यांवरील ग्रामस्थांची.

Maharashtra- Gujrat
Nashik Helmet Drive : वाहनचालकांची कारवाईच्या भीतीने पळापळ; 3 दिवसात 7 लाखांचा दंड वसुल!

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांची समावेश करण्याची मागणी होत असताना गुजरात सीमालगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अनेक गावे-पाडे-वस्त्या मूलभूत विकासापासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे या गावांचा विकास करत येत नसेल तर ही सर्व गावे गुजरातमध्ये विलीन करावी, अशी मागणीचे निवेदन चिंतामण गावित यांनी तहसीलदारांना दिले. या मागणीनंतर ‘सकाळ’च्या बातमीदाराने या गावे, वाड्या, वस्त्यांवर जात ग्रामस्थांशी चर्चा केली.

यात गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या या गावे-वाड्या, तसेच पाडयांवर रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वीज या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. हाकेच्या अंतरावरील गावांना गुजरात राज्य शासन मूलभूत सुविधा पुरवत असताना महाराष्ट्र राज्यात शासनाकडून सुविधा पुरविल्या जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये शासनाविषयी रोष होता. यातील खुंटविहिर असो की पिंपळसोंड, या गावातील ग्रामस्थांनी तर थेट महाराष्ट्र शासन सुविधा पुरविण्यात अपयशी असल्याचा आरोप करत आमच्या गावे गुजरातला जोडण्याची मागणी केली.

Maharashtra- Gujrat
सह्याद्रीचा माथा : राऊत, बंडाची चर्चा, भारतीताई आणि अण्णा

तसेच आम्हाला सुविधा देता येत नसेल तर आमची गावे गुजरातला जोडण्यात यावी, अशी घोषणाबाजी केली. याच पार्श्वभूमीवर या ५५ हून अधिक असलेल्या गावे-वाडे व वस्त्यांवरील ग्रामस्थांनी एकत्र येत या विरोधात भूमिका घेण्याची तयारी केली आहे. यासाठी रविवारी (ता. ४) बैठक होत आहे. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.

गुजरात इज बेस्ट
''गावांमध्ये रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षणाच्या मूलभूत सुविधांची मागणी आहे. मात्र, या सुविधा पुरविण्यात राज्य शासन अपयशी ठरत आहे. याच मूलभूत सुविधा अगदी हाकेवर असलेल्या गुजरात राज्यातील गावांना ज्या की आमच्यातील असणाऱ्यांना मिळतात. मात्र, आम्ही या सुविधांपासून वंचित आहोत. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आम्हाला सुविधा द्याव्यात अन्यथा आमच्या गावे गुजरातला जोडावी.'' -लहानू चौधरी, पिंपळसोंड (ता. सुरगाणा)

Maharashtra- Gujrat
BJP Mission 2024 : डॉ. भारती पवार यांची नाशिक लोकसभेत Entry

चिंतामण गावित राष्ट्रवादीचा राजीनामा देणार?
गुजरात सीमावर्ती भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ही गावे गुजरातमध्ये विलीन करावी, या मागणीचे निवेदन सादर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांच्या भूमिकाबाबत राष्ट्रवादीने हात झटकले आहे. गुजरातमध्ये गावे विलीन करण्याची गावित यांची मागणी वैयक्तिक असल्याचे राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले. त्यामुळे गावित तालुकाध्यक्षासह राष्ट्रवादीचा राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आहेत.

याबाबत रविवारी या गावांमधील ग्रामस्थांच्या होत असलेल्या बैठकीत गावित आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या गावांना मूलभूत सुविधा न पुरवून शासन या गावांवर अन्याय करत आहे. त्यासाठी या गावांच्या विकासासाठी भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे गावित यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.