राज्यात पुन्हा पाऊस! पुढील ४ तासांत 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Forecast Rain Alert
Maharashtra Weather Forecast Rain AlertSakal
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापमान (Maharashtra Weather Forecast) वाढले आहे. काही ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पण, वातावरणात अचानक बदल झाला असून येत्या तीन ते चार तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार (Maharashtra Rain Alert) आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे.

Maharashtra Weather Forecast Rain Alert
Pune Corporation Election: हरकतींचा पाऊस पण सुनावणीला निरुत्साह

या जिल्ह्यांना अलर्ट -

राज्यातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार तासांत सोसाट्याचा वारा, वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यात ५ मार्चपर्यंत पावसाची शक्यता -

आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यासह दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात येत्या पाच मार्चपर्यंत पावासाची शक्यता आहे. पुण्यातील हवामान विभागानं सकाळीच हा अंदाज वर्तवला होता. पुण्यातील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे. तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलसह दक्षिणेकडील भारताच्या काही द्वीपकल्पीय भागांमध्ये जोरदार अतिवृष्टीची शक्यता आहे.

उन्हाची तीव्रता कमी होणार -

राज्यात तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत होत्या. काही ठिकाणी उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता पावसाच्या सरी बरसल्यानंतर नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.