मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रात्री जोराचा पाऊस तर दिवसा कडक ऊन, असे वातावरण पाहायला मिळत आहे. यादरम्यान आज पुन्हा हवामान विभागाकडून मुंबईत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच येत्या काही दिवसात राज्यात देखील पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.