Mumbai Rain Alert: मुंबईत ऑरेंज अलर्ट, काय असतो नेमका अर्थ?

मुंबईमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
rainy season | Mumbai Rain Alert
rainy season | Mumbai Rain Alertsakal
Updated on

सध्या राज्यभरात पावसाचा जोर सुरू आहे. मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात (Konkan) पावसानं जोरदार हजेरी लावलीय. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावलाय.

मुंबईमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पण तुम्हाला माहिती आहे का? हवामान खात्याकडून अलर्ट कधी जारी केले जातात? एकूण किती प्रकारचे अलर्ट असतात? आणि या अलर्टचा नेमका अर्थ काय असतो? या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. (maharashtra weather update do you know meaning of red orange yellow and green alert)

rainy season | Mumbai Rain Alert
PHOTO : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं दणक्यात स्वागत

एकूण चार प्रकारचे अलर्ट असतात.

1. ऑरेंज अलर्ट

2. ग्रीन अलर्ट

3. येलो अलर्ट

4. रेड अलर्ट

rainy season | Mumbai Rain Alert
राणे, भुजबळांनीही असचं भाषण केलं होतं; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

ऑरेंज अलर्ट: कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता जेव्हा असते तेव्हा ऑरेंज अलर्ट दिला जातो.त्याचप्रमाणे नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अशी सुचना या अलर्टद्वारे दिली जाते. वाहतूक ठप्प होणे यासारख्या समस्या देखील ऑरेंज अलर्टचा एक इशारा असतो.

ग्रीन अलर्ट: पावसादरम्यान जेव्हा परीस्थिती सामान्य असते तेव्हा ग्रीन अलर्ट हवामान खात्याला दिला जातो.या दरम्यान कुठलेच निर्बंध नसतात

येलो अलर्ट: येणाऱ्या दिवसांमध्ये नैसर्गिक संकट येऊ शकतात तर यामुळे जनजीवन विस्कळीत येऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

रेड अलर्ट: रेड अलर्ट हे मोठं संकटाची चेतावणी असते. मोठं नुकसान होण्याची शक्यता या अलर्टमधूव वर्तवली जाते. तसेच नागरिकांनी स्वत:ला सुरक्षित ठेवावं या अलर्टचा अर्थ असतो.

rainy season | Mumbai Rain Alert
..म्हणून अपात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं!

जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर, जिल्ह्यासह राज्यात पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत.

मुंबईमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात होता.रत्नागिरी जिल्ह्यात जगबूडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, रायगड जिल्ह्यात सावित्री नदीदेखील इशारा पातळीवरुन वाहत आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ) तुकड्या कोकण, मुंबई आणि विदर्भात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.