Weather Update: IMD कडून 5 दिवसांसाठी राज्याला गंभीर इशारा; ऑरेंज अलर्ट

उन्हाळ्यात देशातील हवामानात मोठा बदल
maharashtra weather update
maharashtra weather update sakal
Updated on

महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांसाठी आयएमडीकडून हवामानाचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. (maharashtra weather update IMD five days rain Vidarbha )

मे महिन्याच्या सुरुवातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात पूर आल्याची परिस्थिती देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे.

maharashtra weather update
अमोल कोल्हेंच्या CMपदाबाबतच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच..

आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी गंभीर इशारा दिला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. ३० एप्रिल तसेच १, २ व ३ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे.

maharashtra weather update
Maharashtra Din : महाराष्ट्रातील अद्भूत असं ठिकाण, म्हणतात परशुरामांनी याची निर्मिती केली, एकदा बघाच

तर विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १, २ व ३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात १ मे रोजी गारपीट तर २ आणि ३ मे रोजी पाऊस पडणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.