गेल्या काही दिवसांपासून, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अनेक भागात हलक्या ते मध्यम सरींनी लक्षणीय पाऊस झाला आहे. मात्र, आता थंडी परतल्याने वातावरण शांत झाले आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट जाणवत आहे. एका दिवसात किमान तापमान 4 अंश सेल्सिअसने घसरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या 24 तासांत धुक्याच्या पातळीत वाढ होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.