महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार; भाजप आमदाराचं सूचक वक्तव्य

Shivendrasinharaje Bhosle
Shivendrasinharaje Bhosleesakal
Updated on
Summary

विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेत फुट पडण्याची शक्यता आहे.

सातारा : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेत (Shiv Sena) फुट पडण्याची शक्यता आहे. एकीकडं पक्षाचे वरिष्ठ नेते पराभवाच्या कारणांवर विचारमंथन करत आहेत, तर काही नेते ‘नॉट रिचेबल’ आहेत. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सोमवारी सायंकाळपासून संपर्कात नाहीयत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 17 आमदार देखील असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधलाय.

महाराष्ट्रात (Maharashtra) लवकरच देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या नेतृत्वात सरकार येणार आहे. त्याच्या हालचाली कालच्या विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर (Maharashtra Vidhan Parishad Election Result) सुरू झाल्या आहेत, असं सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज केलं. साताऱ्यातील सुरुची बंगला इथं माध्यमांशी ते बोलत होते.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आज (मंगळवार) सकाळपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विशेषत: शिवसेनेत काही घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांचे फोन लागत नसल्यानं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सेनेचे आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 17 आमदारांचे मोबाईल फोन नाॅट रिचेबल झाल्यानं राज्यात राजकीय भूंकप घडणार अशी चर्चा रंगू लागलीय.

Shivendrasinharaje Bhosle
Indian Army : अग्निपथ योजनेविरोधात तिसरी याचिका दाखल

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीपूर्वी संभाजीराजेंची गेम झाली मी एवढंच म्हटलं होतं. मी कोणाचं नाव देखील घेतलं नव्हतं. त्यानंतर खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ते मनाला का लावून घेतलं काय माहिती. ते खासदार आहेत. त्यांचं किंवा कोणत्या पक्षाचं नाव घेतलं नव्हतं, असं स्पष्ट करत ते म्हणाले, महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येईल. विकासकामांच्या दृष्टीनं मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांच्याशी माझी नेहमी भेट होत असते. राज्यात मध्यावधी निवडणूक होतील का नाही हे आता सांगू शकत नाही, असंही राजेंनी स्पष्ट केलंय.

Shivendrasinharaje Bhosle
विरोधी पक्ष यशवंत सिन्हांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देणार?

शिवसेनेचे कोणते आमदार नॉट रिचेबल?

एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील (अपक्ष), संजय राठोड, प्रताप सरनाईक, राजन साळवी, योगेश कदम, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेंद्र दळवी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे, विश्वनाथ भोईर यांच्यासह आणखी काही आमदार संपर्कात नसल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.