Maharashtra Karnataka border issue: तोपर्यंत 'हा' भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा; उद्धव ठाकरेंची मागणी

Maharashtra Karnataka border issue: तोपर्यंत 'हा' भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा; उद्धव ठाकरेंची मागणी
Updated on

राज्य हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहभाग नोंदवला कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरुन सत्ताधाऱ्यांचा ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरुनही ठाकरेंनी टोलेबाजी केली. (Maharashtra Winter Session 2022 Maharashtra Karnataka border issue Uddhav Thackeray )

काय म्हणाले ठाकरे?

मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आहे. सीमाप्रश्नावर एकमत असल्याने सर्वांचे आभार. हा माणुसकीचा लढा आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. एवढाच काळ किंवा यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसं मराठीत बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे असं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यावर ठरावही मान्य झाला आहे.

मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण विरोधी पक्षात आलं की पेन ड्राईव्ह यायला लागतात, अशी एक पद्धत झाली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये महाराष्ट्र सरकारने केलेली ‘केस फॉर जस्टीस’ ही फिल्म आहे. ती फिल्म मी मुद्दामहून आणली आहे,

तसेच, त्या फिल्मचा उद्देश स्पष्ट आहे. साधारणतः १८ व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरली जाते हे दाखवलं आहे. त्यात जुन्या मराठी पाट्या, प्रशासकीय कामकाजाचे मराठीतील कागदपत्रं आहेत. शाळा मराठी होत्या, महिला मंडळ आणि इतर संस्थाही मराठी होत्या हेही त्यात दाखवलं आहे. हे सगळे पुरावे त्यात आहेत. परंतु त्या फिल्मच्या अर्ध्या भागात ऑडिओच नाही.

मी तुम्हाला हा पेन ड्राईव्ह देऊ इच्छितो. आपण तो पेन ड्राईव्ह घ्यावा. माझी विनंती आहे की, या पेन ड्राईव्हमधील फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी. जेणेकरून नव्या पिढ्यातील लोकप्रिय सदस्यांना हा ठराव म्हणजे काय, तो कशासाठी केला जातो आहे, आपण का सीमाभागातील जनतेच्या पाठिशी उभं राहायचं हे कळेल,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

कर्नाटक सरकार म्हणाले एक इंच जागा आम्ही सोडणार नाही. एवढी धमक आपल्यात आहे का? आज एका पक्षाचे सरकार केंद्रात आहे. मुख्यमंत्री आज दिल्लीत गेले महाराष्ट्राचा विषय सोडून दिल्लीत जाणे खरच गरजेचे आहे का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

तिथे मराठीचा ठसा पुसण्याचा प्रयत्न आहे. मला एक तरी उदाहरण दाखवा मराठी माणसाने कर्नाटक भाषिकांवर अन्याय केला. काहीजण खालच्या सभागृहात म्हणाले आम्ही लाठ्या खाल्या. पण त्यावेळी तुम्ही आमच्या पक्षात होता. असा टोला ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

केंद्र सरकार पालक म्हणून वागतय का. कर्नाटक आग्रही भूमिका मांडते तशाप्रकारे आपले सरकार भूमिका मांडते का? मुख्यमंत्र्यांना दिल्ली जाण्याची गरत होती का? सीमावादाच्या मुद्यावर दिल्लीत तोंड का उघडत नाही. असे अनेक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

तसेच, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. त्यांचे व्यवहार मराठीत असतानाही त्यांनी मराठी भाषा शिकून दिली जात नाही. तर असं होत असेल तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? जोपर्यंत हा वाद कोर्टात प्रलंबित आहे तोपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा. अशी मागणीदेखील ठाकरे यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.