Maharashtra Winter Session : फक्त महाराष्ट्रचं नाही तर नागपूरमध्ये या राज्याचे देखील अधिवेशन झालेलं

nagpur winter session
nagpur winter sessionesakal
Updated on

Maharashtra Winter Session : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात राज्याचे दोन्ही सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद समाविष्ट आहेत,.नागपूरमध्ये दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित केली जातात. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे.

nagpur winter session
Astro Tips About Saturday : सावधान! शनिवारी या गोष्टी दान करणं ठरू शकतं घातक...

नागपूर शहर केवळ भौगोलिक कारणामुळेच नव्हे तर सांस्कृतिक, ऐतिहासिक, औद्योगिक, साहित्यिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींमुळे अग्रेसर ठरले आहे. सन १८५३ मध्ये ब्रिटीश सरकारने नागपूरकर भोसले यांचे राज्य खालसा करून नागपूर प्रांत घोषित केला. या प्रदेशांचा कारभार पाहण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने कमिशनरची नियुक्ती केली. १८५७ च्या उठावानंतर प्रशासनात मोठे फेरबदल झाले. १८३१ मध्ये नागपूर प्रांताला मध्यप्रांत जोडण्यात आला व नागपूरला मध्यप्रांताची राजधानी करण्यात आली. 

nagpur winter session
Pune Travel : पुण्याजवळ वनडे ट्रीप करायची आहे? चुकवू नये अशी बेडसे लेणी

१९०३ मध्ये मध्यप्रांताला, वन्हाड प्रांत जोडण्यात आला आणि त्यानंतर मध्यप्रांत व बेरार (सीपी अँड बेरार) स्थापन झाला. १९३५ च्या कायद्यानुसार विधिमंडळाची निर्मिती झाली. १९५० मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतर सीपी अँड बेरार चे नामाभिधान मध्यप्रदेश असे झाले. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनुसार ०१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व त्यात विदर्भात प्रांत समाविष्ट करण्यात आला. नागपूर करारानुसार विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरला घेण्याबाबत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी धोरणविषयक एक निवेदन सभागृहांना सादर केले.

nagpur winter session
Dinosaur In India : भारतातून डायनोसॉर अचानक नामशेष कसे झाले?

याला नागपूर करार असं ओळखलं जातं.  त्यासंबंधीच्या प्रस्तावावर विधानपरिषदेत १२ ऑगस्ट, १९६० तर विधानसभेत १७ ऑगस्ट, १९६० रोजी प्रदीर्घ चर्चा झाली आणि वर्षातून विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्याचे निश्चित झाले आणि १९६० पासून महाराष्ट्र विधानमंडळाची अधिवेशने नागपूर येथे भरू लागली. तत्पूर्वी विदर्भ भाग १९५६ पर्यंत मध्यप्रदेश राज्यात समाविष्ट होता व नागपुर हे मध्यप्रदेश राज्याचे राजधानीचे ठिकाण होते.

nagpur winter session
Trip To Kalasubai : न्यू इयर साठी दोन दिवसांच्या ट्रिपच प्लॅनिंग करत आहात? मग भेट द्या महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला

नागपूर येथील कौन्सिल हॉल इमारतीमध्ये तत्कालीन मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभेची अधिवेशने भरत असत. नागपूरातील उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ०६ जानेवारी, १९३६ रोजी याच इमारतीत झाला होता तर ३० जुलै, १९३७ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन नेते डॉ एन. बी. खरे यांच्या शपथविधी सोहळ्याची साक्षीदारसुद्धा ही इमारत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले नागपूर अधिवेशन दिनांक १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर, १९६० या कालावधीत येथे संपन्न झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.