सहा 'ZP'त भाजपला २३, तर महाविकास आघाडीचा ४६ जागांवर विजय

 सहा 'ZP'त भाजपला २३, तर महाविकास आघाडीचा ४६ जागांवर विजय

ZP, Panchayat Samiti By-elections results : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४; तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. आज त्याचे निकाल घोषित झाले. यामध्ये महाविकास आघाडीला एकूण ४६ जागा मिळाल्या असून भाजपला २३ जागा मिळाल्या आहेत. पक्षाचा विचार केला, तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तरीही महाविकास आघाडीची सरशी आहे.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला ४६, भाजपला २३ जागा

अकोला - एकूण १४ जागा

  • भाजप ०१

  • प्रहार - ०१

  • वंचित - ०६

  • शिवसेना - ०१

  • राष्ट्रवादी ०२

  • काँग्रेस ०१

  • इतर - ०२

नागपूर : एकूण १६ जागा

  • काँग्रेस: ०९

  • भाजपा: ०३

  • राष्ट्रवादी :०२

  • गोगंपा: ०१

  • शेकाप: ०१

धुळे - एकूण जागा १

  • भाजप- 8

  • काँग्रेस - 2

  • राष्ट्रवादी - 3

  • शिवसेना- 2

वाशिम - एकूण जागा - १४

  • अपक्ष : 01

  • शिवसेना : 01

  • राष्ट्रवादी : 05

  • भाजप : 02

  • काँग्रेस : 02

  • जनविकास : 01

नंदुरबार - ११ जागा

  • भाजप - ०४

  • शिवसेना ०३

  • राष्ट्रवादी - ०१

  • काँग्रेस - ०३

पालघर - १५ जागा

  • भाजप - ०५

  • शिवसेना ०५

  • राष्ट्रवादी ०४

  • काँग्रेस ००

  • इतर ०१

===================

एकूण - ८५

भाजप - २३

शिवसेना -१२

काँग्रेस -१७

राष्ट्रवादी - १७

इतर - १६

======================

महाविकास आघाडी - ४६

भाजप - २३

इतर - १६

एकूण - ८५

पालघर जि. प. : महाविकास आघाडीचा झेंडा, १५ जागांपैकी भाजपला ०५, शिवसेना ०५, राष्ट्रवादी ०४, काँग्रेस शून्य, इतर पक्षाला ०१ जागा मिळाली.

धुळे जिल्हा- आत्तापर्यंत जाहीर अधिकृत निकाल

धुळे तालुका (zp गट)- एकूण 11 जागा.... पैकी विजयी- भाजप 4, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2, शिवसेना 1 (बिनविरोध)

शिंदखेडा तालुका (गट)- एकूण 4 जागा.... पैकी विजयी- भाजप 3, राष्ट्रवादी 1

नागपूर जिल्हा परिषदेचे सर्व निकाल हाती आले असून काँग्रेसने विजय मिळवला असून भाजपचा सुपडासाफ झाला आहे.

काँग्रेस 9

भाजप 3

राका 2

1 गोंगपा

1 शेकाप

नंदुरबारमध्ये काँग्रेसची सत्ता कायम; भाजपची पिछेहाट

नंदुरबार - जि प गटातील पक्षनिहाय विजयी उमेदवार

1) कोळदा गट : सुप्रिया विजयकुमार गावित (6707) _भाजप

2) खोंडामळी गट : शांताराम साहेबराव पाटील - भाजप (7077)

3). लोणखेडा गट : जय श्री दीपक पाटील - भाजप (7357)

4) कहाटूळ गट : ऐश्वर्या जयपालसिंह राऊळ - भाजप (5820)

5) कोपरली गट : राम चंद्रकांत रघुवंशी -शिवसेना (8668)

6) रनाळा गट : शकुंतला सुरेश शिंत्रे- शिवसेना (7097)

7) मांडळ गट : जागृती सचिन मोरे - शिवसेना

8)खापर गट : गीता चांदया पाडवी- काँग्रेस (6597)

9) अक्कलकुवा गट : सुरया बी अमीन मकरानी (3006)

10) म्हसावद गट : हेमलता अरुण शितोळे - काँग्रेस (5804)

11) पाडळदा गट : मोहन सिंग पवन सिंग शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस- (4803)

पक्षीय बलाबल

भाजप - 4

काँग्रेस - 3

शिवसेना - 3

राष्ट्रवादी काँग्रेस - 1

एकूण गट 11

धुळे जिल्हा- आत्तापर्यंत जाहीर अधिकृत निकाल

धुळे तालुका (zp गट)- 11 जागा.... पैकी विजयी- भाजप 4, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1 (बिनविरोध)

शिंदखेडा तालुका (गट)- 4 जागा.... पैकी विजयी- भाजप 3, राष्ट्रवादी 1

वाशीम - रिसोड तालुक्यातील कवठा गटातून काॅग्रेसचे वैभव सरनाईक विजयी जनविकास आघाडीचे स्वप्निल सरनाईक पराभूत

डहाणूमध्ये शिवसेना खासदाराच्या मुलाचा पराभव

डहाणू मध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. सेनेच्या खासदार पुत्राचा पराभव झाला असून त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. कांग्रेस आणि भाजपमध्ये इथं लढत बघायला मिळाली. भाजपचे उमेदवार पंकज कोरे यांनी ४१२ मतांनी विजय मिळवला.

 सहा 'ZP'त भाजपला २३, तर महाविकास आघाडीचा ४६ जागांवर विजय
ZP Election Akola - वंचित बहुजन आघाडीने राखला जिल्हा परिषदेचा गड

अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)

निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14

1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना

2) घुसर : शंकरराव इंगळे, वंचित

3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष

4) अंदूरा : मीना बावणे : वंचित

5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी

6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष

7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित

8) बपोरी : माया कावरे : भाजप

9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित

10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित

11) दगडपारवा : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी

12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस

13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार

अकोला - अकोट तालुक्यातील बहुचर्चित कुटासा जिल्हापरिषद गटांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना मोठा धक्का. राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे स्मृती गावंडे या विजयी झाल्या

बोथिया पालोरा येथून   गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार हरीश उईके विजयी
बोथिया पालोरा येथून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार हरीश उईके विजयी

अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)

निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14

1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना

2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित

3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष

4) अंदूरा : मीना बावणे : वंचित

5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी

6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष

7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित

8) बपोरी : माया कावरे : भाजप

9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित

10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित

एकूण जागा : 14

निकाल जाहीर : 10

वंचित : 05

अपक्ष : 02

शिवसेना : 01

राष्ट्रवादी : 01

भाजप : 01

वसईत पंचायत राज हितेंद्र ठाकूर यांच्याकडे

वसई पंचायत समितीच्या भाताणे व तिल्हेर या दोन गणासाठी पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीने वर्चस्व निर्माण केले आहे.हितेंद्र ठाकूर यांच्याकडे पंचायत राज आल्याने सेनेची कोंडी झाली आहे.भाताणे गणातून अशोक आत्माराम पाटील तर तिल्हेर याठिकाणाहून गीता पाटील यांनी विजयश्री खेचून आणली आहे.

वाशीमः जि. प. एकूण जागा - १४

घोषित निकाल ७

काँग्रेस - २,

सेना -१,

राष्ट्रवादी -१,

जनविकास - १,

अपक्ष - १,

वंचित १.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.सावरे-एम्बुर गटात शिवसेनेच्या विनया पाटील आणि नंदोरे देवखोप गटातुन शिवसेनेच्या नीता पाटील विजयी झाल्या आहेत.

जिल्हा परिषद सर्कल राजोला येथे कांग्रेसचे अरुण हटवार विजयी

अकोट: अकोलखेड सर्कलमध्ये जिल्हा परिषद गणातून शिवसेनेचे जगन निचळ विजयी

अकोला: जिल्हा परिषद कुरणखेड मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे सुशांत बोर्डे विजयी

तेल्हारा: जिल्हा परिषद आडगाव बु. मतदार संघात अपक्ष उमेदवार प्रमोदिनी गोपाल कोल्हे विजयी

बार्शीटाकळी : जि.प.दगडपारवा मतदार संघ राष्ट्रवादीच्या सुमनताई गावंडे विजयी

बाळापूर: जिल्हा परिषद देगाव मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे राम गव्हाणकर विजयी

पातूर जिल्हा परिषद शिर्ला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे सुरेश फाटकर विजयी

खात पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या दुर्गा ठाकरे १३६५ मतांनी विजयी

हिंगणा तालुका....

निलडोह-वडधामना जि.प.

संजय जगताप..५७४६ काँग्रेस...विजयी

राजेंद्र हरडे भाजप ...४६९५ पराभुत

१०५१ मतांनी विजयी

निलडोह- वडधामना पं.स.

१) वैशाली काचोरे काँग्रेस...२७२६ विजयी

२) बबीता आंबटकर भाजप..२०७४ पराभुत

६५२ मतांनी विजयी

हिंगणा तालुका....

निलडोह-वडधामना जि.प.

संजय जगताप..५७४६ काँग्रेस...विजयी

राजेंद्र हरडे भाजप ...४६९५ पराभूत

निलडोह- वडधामना पं.स.

१) वैशाली काचोरे काँग्रेस...२७२६ विजयी

२) बबीता आंबटकर भाजप..२०७४ पराभूत

जिल्हा परिषद पारदसिंगा सर्कलमधून मीनाक्षी सरोदे 2400 मतांनी विजयी

भिवापूर पंचायत समितीच्या नांद सर्कलमधून काँग्रेसच्या माधुरी संजय देशमुख २०३९ मतांनी विजयी.

उमेदवारांना प्राप्त मते पुढीलप्रमाणे -

१) माधुरी संजय देशमुख ( काँग्रेस ) - ४२५९

२) शोभा मोरेश्वर चुटे ( भाजप ) - २२२०

३) वनिता संतोष घरत ( शिवसेना ) - १३०१

४) सुनिता अशोक वाघ ( वंचीत ) - ३१७

नोटा - ८६ मते

अरोली कोदामेंढी सर्कल काँग्रेसचे योगेश देशमुखांनी परत खेचून आणला विजय

पालघर जिल्हा परिषद आलोंडे जिल्हा परीषद गट - भाजपाचे उमेदवार संदीप पावडे 802 मतांनी विजयी...

हिंगणा तालुका....

निलडोह-वडधामना जि.प.

संजय जगताप..५७४६ काँग्रेस...विजयी

राजेंद्र हरडे भाजप ...४६९५ पराभूत

--------------------------------------

निलडोह- वडधामना पं.स.

१) वैशाली काचोरे काँग्रेस...२७२६ विजयी

२) बबीता आंबटकर भाजप..२०७४ पराभूत

६५२ मतांनी विजयी

भाताणे व तिल्हेर दोन्ही गण हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तर वसई पंचायत समितीवर बविआचे निर्विवाद वर्चस्व....

पक्षीय बलाबल-

बविआ-०५,

भाजप-०२,

शिवसेना.०१,

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणूक बोर्डी गट क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्योती प्रशांत पाटील  5283 मते मिळवून विजयी झाल्या

जिल्हा परिषद कुरणखेड मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे सुशांत बोर्डे विजयी

नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गटातून राम रघुवंशी शिवसेना तीन हजार दोन मतांनी विजयी

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता

नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गटातून शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी 2413 मतांनी आघाडीवर

वाशीम - काँग्रेसच्या संजीवनी रणजित राव घुगे जऊळका प स गणातून विजयी

वाशीम - पांगरी नवघरे जि प सर्कलमधून वंचित बहुजन आघाडीच्या लक्ष्मी सुनील लहाने विजयी

मुर्तिजापूर तालूक्यातील जि. प. लाखपूरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे विजयी.

वाशीम तालुक्यातील उकळीपेन गटात शिवसेनेचे सुरेश मापारी आघाडीवर, वंचित बहुजन आघाडीचे दत्तराव गोटे पिछाडीवर

भिवापूर पंचायत समितीच्या नांद सर्कल मधून काँग्रेसच्या माधुरी संजय देशमुख २०३९ मतांनी विजयी.

उमेदवारांना प्राप्त मते पुढीलप्रमाणे -

१) माधुरी संजय देशमुख ( काँग्रेस ) - ४२५९

२) शोभा मोरेश्वर चुटे ( भाजप ) - २२२०

३) वनिता संतोष घरत ( शिवसेना ) - १३०१

४) सुनिता अशोक वाघ ( वंचीत ) - ३१७

शहादा तालुक्यातील पाडळदा गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहन शेवाळे हे विजयी झाले

बाळापूर तालुक्यात अंदुरा व देगाव जिल्हा परिषद वंचितच्या ताब्यात

अंदुरा

मीनाताई संजय बावणे (वंचित) ५०५१ विजयी

मीना रविंद्र पोहरे (सेना) २९१७

वानखडे रमा ६९

नोटा ६८

एकूण ११७२२

निमकर्दा पंचायत समिती

राजकन्या कवरकार (वंचित) २१७३ विजयी

छाया पटोकार ११०१

पारसकर विभा १७२९

वानखडे शितल २२६

नोटा ४६

एकूण : ५२७५

आडगाव जिल्हा परिषदेत - वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर सदस्य गोपाल कोल्हे विजयी

खोंडामळी गटात भाजपचे उमेदवार शांताराम साहेबराव पाटील 87 मतांनी विजयी झाले आहेत

दगडपारवा जि. प गट : राष्टवादीच्या सुमनताई भास्कर गावंडे २६३८ मतांनी विजयी

पालघर जिल्हा परिषद गारगांव गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे 500 मतांनी पुढे, याठिकाणी निवडणुकीपूर्वी भाजपच्या उमेदवाराने शिवसेनेला पाठींबा दिला होता.

पालघर जिल्हा परिषद मोखाड्यातील आसे जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष ऊमेदवार हबीब शेख विजयी.

अकोलखेड सेनेचे सूरज गणभोज यांचा विजय, चार वर्षाच्या मुलीच्या हाताने उधळली होती ईश्वरचिठ्ठी

बेलोणा पंचायत समिती भाजपच्या सौ हेमलता सातपुते 500 मतांनी विजयी

भिवापूर पंचायत समितीच्या नांद सर्कल मधून काँग्रेसच्या माधुरी संजय देशमुख विजयी

काटोल तालुका- जि.प. पारडसिंगा- भाजपा मीनाक्षी संदीप सरोदे यांची 1006 मतांनी आघाडी घेतली.

जि.प. येनवा सर्कलमध्ये समीर उमप शेकाप( महाविकास आघाडी) 2453 मतांनी आघाडी, विजयाचे कडे वाटचाल

वाशीम तालुक्यातील पार्डीटकमोर गटात अपक्ष सरस्वती चौधरी विजयी

आतापर्यंत जो कल आपण पाहतोय ते पाहता भाजप मागे पडला आहे- अजून निकाल यायला वेळ आहे पण काँग्रेस बऱ्याच जागेवर आघाडीवर आहे - नाना पटोले

अकोट - खेड मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना समान मतं, निकाल ईश्वरचिठ्ठीने

कंरभाड जिल्हा परिषद मतमोजनीमध्ये अंचॅना भोयर आधाडीवर

सावरगाव जि. प. सर्कल मधून अंजली सतीश शिंदे अपक्ष 322 मतांनी पुढे

पालघर जिल्हा परिषद - नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गटात शिवसेना विजयी , उमेदवार नीता समीर पाटील शिवसेना

अकोला : मुर्तिजापूर तालूक्यातील जि. प. लाखपूरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे विजयी..

3990 - सम्राट डोंगरदिवे

3364 - अप्पू तिडके - महाविकास आघाडी (शिवसेना)

पालघर : मोखाडा-आसे गटातून राष्ट्रवादी पुरस्कृत हबीबभाई शेख यांचा विजय, कासा गटामध्ये राष्ट्रवादीच्या लतिका बालशी सध्या आघाडीवर

नागपूर जिल्हा परिषद : जि. प.चे विरोधी पक्षनेते असलेले भाजप समर्थित उमेदवार अनिल निधान यांचा गुमथळा गटातून काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला.

नागपूरमध्ये निकाल बदलला... भाजपला धक्का, काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांचा 10 मतांनी विजय

नागपूर पंचायत समिती : कळमेश्वर येथील तेलकामठी पंचायत समितीत काँग्रेसच्या उमेदवार मालती वसू विजयी, डोंगरगाव पंचायत समितीत काँग्रेसच्या उज्जला खडसे विजयी

पालघर : जिल्हा परिषद पहिला निकाल जाहीर, सावरे एमबुरे गटातून शिवसेना विनया विकास पाटील विजयी

अकोला : दहीहंडा जि प सर्कलमधून शिवसेनेचे गजानन वानखडे विजयी,

अकोला हिवरखेड पंचायत समिती : वंचितचे उमेदवार विजयी, तर लाखपूरी सर्कलमधून अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे आघाडीवर, डोंगरदिवे हे वंचितचे बंडखोर आहेत.

नंदुरबार : भाजपच्या सुप्रिया गावित १३२६ मतांनी विजयी

नंदुरबार : हिना गावित यांची बहीण सुप्रिया गावित कोळदा गटातून आघाडीवर

नागपूर : डवलामेटी पंचायत समितीत भाजपच्या ममता जैस्वाल विजयी

अकोल्या पंचायत समितीच्या पहिला राऊंड पूर्ण, शिवसेनेनं उघडलं खातं

नागपुरात पंचायत समिती मतमोजणीला सुरुवात झाली

वाशिममध्ये मतमोजणीला सुरुवात

धुळ्यात ZP मध्ये शिवसेनेने खातं उघडलं, तर पंचायत समितीत भाजपला 2 जागा.

अकोल्यात मतमोजणीला सुरुवात; वंचित, भाजप, काँग्रेसची लढत

वणई मतदार संघात खासदार पुत्र आजमावत आहे, शिवसेनेकडून नशीब पालघरमध्ये या लढतीकडे लक्ष

धुळे- जिल्हा परिषदेत शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त, मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त

नंदुरबार पोटनिवडणूकीत जिल्हा परिषदेच्या 11 गट आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 77 उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज निकाल स्पष्ट होणार

पालघर जिल्हा परिषद आणि त्या अर्तंगत येणाऱ्या ७ पंचायत समिती पोट निवडणूकीसाठी ७ तालुक्यातील केंद्रावर एकूण ६९.१५ टक्के मतदान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यत झाले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी : धुळे- ६०, नंदुरबार- ६५, अकोला- ६३, वाशीम- ६५, नागपूर- ६० आणि पालघर- ६५. एकूण सरासरी- ६३.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()