यवतमाळ - दिवाळी उंबरठ्यावर आली. पण यंदा दिवाळीची रोषणाई इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वात महागडी ठरणार आहे. कारण महाराष्ट्रात वीज वापराचे दर अन्य सर्व राज्यांपेक्षा अधिक आहेत. घरगुती वीज ग्राहकांना १०० युनिटपर्यंत आणि दुकानदारांना साधारण ३०० युनिटपर्यंत वीज वापरासाठी सवलतीचे दर लागू आहेत.
परंतु, दिवाळीत विजेचा वापर साहजिकच या मर्यादेपेक्षा पुढे जाणार आहे. त्यामुळे घसघशीत दर लागू होणार आहेत. तर दुसरीकडे, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने याबाबत अपेक्षानामा जाहीर करत हे दर कमी करण्यासाठी निवडणुकीतील उमेदवारांना साकडे घातले आहे.