‘‘लाडकी बहीण योजना रोखण्यासाठी विरोधक प्रथम मुंबईच्या न्यायालयात गेले. तेथे याचिका फेटाळून लावली. आता नागपूरच्या नागपूरच्या न्यायालयात गेले आहेत. न्यायालयात जाणारे हे काँग्रेस नेत्यांचे जवळीक आहे. यांची नियत ओळखा. राखीची आण आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगतो, उच्च न्यायालयात मोठा वकील देऊ. देवाभाऊ असेपर्यंत काहीही झाले तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही,’’अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.