चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, 18 वर्षाखालील 9 जणांचा समावेश

चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, 18 वर्षाखालील 9 जणांचा समावेश
Updated on

पुणे : राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे आणखी दहा रुग्ण आढळले असून, आतापर्यंत ७६ रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे सोमवारी देण्यात आली. कोरोना नियंत्रणासाठी विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित करण्यात येत आहे. जनुकीय क्रमनिर्धारण हे प्रयोगशालेय सर्वेक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

ते दोन प्रकारे करण्यात येत आहे :

१) सेंटीनल सर्वेक्षण : राज्यातील पाच प्रयोगशाळा आणि पाच रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवड्याला १५ प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या संस्थांना पाठवते.

२) ‘सीएसआयआर’ सोबत समन्वय :

महाराष्ट्र शासनाने जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणास गती मिळावी, यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲड इंडस्ट्रिअल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲड इंटिग्रेटेड बायॉलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून, या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, 18 वर्षाखालील 9 जणांचा समावेश
शरद पवारांचा राज्यपालांना टोमणा; म्हणाले, शब्दांचा मार... शहाण्यालाच!

आणखी दहा रुग्णांचे निदान

इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲड इंटिग्रेटेड बायॉलॉजी या प्रयोगशाळेने राज्यात आणखी १० डेल्टा प्लस रुग्णांचे निदान केले आहे. यापैकी सहा रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील, तीन रत्नागिरी जिल्ह्यातील तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. हे दहा रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ व्हेरियंट आढळत असल्याचे दिसते.

चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, 18 वर्षाखालील 9 जणांचा समावेश
अफगाणिस्तान पुन्हा अंधारयुगाकडे, तालिबानची पोलादी पकड

जिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे-

जिल्हा ..................... डेल्टा प्लसचे रूग्ण

जळगाव .......................... १३

रत्नागिरी .......................... १५

मुंबई ............................... ११

कोल्हापूर ............................. ७

ठाणे, पुणे .......................... प्रत्येकी ६

पालघर, रायगड ................... प्रत्येकी ३

नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग ..........प्रत्येकी २

चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बीड ......... प्रत्येकी १

चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, 18 वर्षाखालील 9 जणांचा समावेश
शरद पवारांचे ओबीसी प्रेम बेगडी, पडळकर यांची टीका

डेल्टा प्लस रुग्णासंबंधी माहिती -

- वयोगट :

१८ वर्षांखालील रुग्णसंख्या : ९

१९ ते ४५ वर्षे गटातील रुग्ण : ३९

४६ ते ६० वर्षे गटातील रुग्णसंख्या : १९

६० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्ण : ९

चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, 18 वर्षाखालील 9 जणांचा समावेश
पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

डोस घेतलेले २२ रुग्ण

- डेल्टा प्लसच्या ७६ रुग्णांपैकी १० जणांचे दोन्हीही कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस झालेले आहेत तर १२ जणांनी केवळ १ डोस घेतला आहे.

- लस घेतलेल्यांपैकी दोन जणांना कोवॅक्सिन तर इतर सर्वांनी कोविशिल्ड लस घेतलेली.

- आजाराचे स्वरूप : या रुग्णांपैकी ३७ रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे होते. त्यामुळे रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासली नाही. ७६ रुग्णांपैकी ७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

- मृत्यू : या ७६ रुग्णांपकी ५ जणांचे मृत्यू (३ पुरुष, २ स्त्रिया)

चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, 18 वर्षाखालील 9 जणांचा समावेश
रक्तपात टाळण्यासाठी आफगाणिस्तान सोडलं, राष्ट्रपती घनी यांचं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.