Maharashtra TET Exam 2024 Online Application Process:
पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्रताधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरता येणार आहे.
राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षक या पदांसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
राज्यात पवित्र पोर्टल संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात पदे भरण्यासाठी ही परीक्षा राबवण्यात येत आहे. राज्य परीक्षा परिषदेने याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.