Maharashtra Wedding: राज्यातील या शहरात एका दिवसात पार पडली तब्बल ७०० लग्न

Maharastra Wedding
Maharastra Weddingsakal
Updated on

Maharastra Wedding: लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. परंतु, नवी मुंबई शहरात आजचा दिवस लग्नाकरीता महत्त्वाचा असल्याचे दिसून आले. कारण पनवेलपासून ते अगदी दिघ्यापर्यंत शहरातील विविध मंगल कार्यालयांमध्ये ७०० पेक्षा अधिक लग्न सोहळे पार पडले आहेत. त्यामुळे कॅटर्स, डेकोरेटर्स आणि मंगलकार्यालय व्यवस्थापनांची चांगलीच दमछाक झाली होती.


पंचांगानुसार यंदाच्या वर्षी एप्रिल आणि मे या हंगामात लग्नकार्याकरीता फारसे मुहूर्त नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तुळशीच्या लग्नापासून सर्वत्र ठिकाणी लग्न समारंभ जोरदार सुरु झाली आहेत. नवी मुंबई शहरात महापालिकेनेही बहुउद्देशीय इमारतींमध्ये लग्न कार्याकरीता सभागृहे तयार केली आहेत. या व्यतिरिक्त अनेक खासगी व सामाजिक संस्थांचीही सभागृहे आहेत.

Maharastra Wedding
Wedding Shopping : ‘आला आला रूखवत’; असंख्य व्हरायटी अन् होलसेल रेट, पुण्यातल्या या मार्केटला नक्की भेट द्या

ही सर्व सभागृह आजच्या लग्न सोहळ्यांमुळे हाऊसफुल्ल ठरली आहेत. शहरात जवळपास २५० पेक्षा जास्त लहान-मोठी मंगल कार्यालये आणि सभागृह असतील. तर ३५० पेक्षा जास्त कॅटर्स आहेत. त्यापेक्षा ५० टक्क्यांनी कमी डेकोरेटर्स आहेत. या सर्वांनाच आजच्या दिवशी अधिक असल्याने मोठी मागणी होती.


परराज्यातील लग्न पद्धतींची पगडा
- सध्या पूर्वी प्रमाणे लग्न कार्यक्रम पार पडण्याचे परंपरा कमी झाली आहे. नव्या फॅशन आणि परराज्यातील हळदी, मेहंदी आणि संगीत अशा नव्या प्रथा रुजू झाल्या आहेत. आलिशान व भव्य सेट, राजे-महाराजांच्या पेहराव्यासारखी वेशभूषा अशा महागड्या गाड्यांमध्ये वधू व वराचे आगमन अशा पद्धती विवाह सोहळे होत आहेत. एकाच दिवशी हे सर्व कार्यक्रम करण्याऐवजी दोन ते तीन दिवस लग्न सोहळे सुरु आहेत.

Maharastra Wedding
Virat-Anushka Wedding Anniversary: विराट-अनुष्कानं 'या' खास अंदाजात साजरा केला लग्नाचा सहावा वाढदिवस!

एकच सभागृह दोन लग्नांमध्ये विभागून देताना व्यवस्थापनांचा गोंधळ उडत आहे. बऱ्याच ठिकाणी घोड्यावर वरात काढण्याची पद्धत असते. तर लग्नाच्या वरातील बँडबाजा हा असायलाच हवा. त्याशिवाय वरात निघत नाही. परंतु, आजच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे झाल्यामुळे या सर्वच घटकांची धावपळ झाली होती.

गेल्या वर्षी सुद्धा १८ डिसेंबरला नवी मुंबईत एकही लग्नाचा हॉल उपलब्ध नव्हता. त्याचप्रमाणे आजही नवी मुंबईत जवळपास ७०० पेक्षा जास्त लग्न सोहळे झाले. एप्रिल व मे मध्ये फारसे मुहूर्त नसल्याने डिसेंबर, जानेवारीत लग्न सोहळ्यांचे प्रमाण अधिक आहे. कोविडनंतर कॅटर्स, डेकोरेटर्स आणि इतर घटकांना सध्या चांगले दिवस आले आहेत.
- कैलास मुद्रस, गौतम कॅटर्स

Maharastra Wedding
Kunal- Mukti Mohan wedding: 'अ‍ॅनिमल' फेम अभिनेत्यासोबत डान्सर अन् अभिनेत्री मुक्ती मोहनने बांधली लग्नगाठ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.