Mahashivratri 2024 Special Story: सांगलीत समुद्र आहे असे कोणी सांगितले तर तूमचा विश्वास बसेल का? नाही ना?पण हो हे खरे आहे. त्याच समुद्राच्या पाण्यावर उभी असलेली १०८ शिवलींग सांगलीत आहेत.
सांगली शहरापासून ५० किलोमीटर लांब सागरेश्वर हे देवस्थान आहे. या देवस्थानाबद्दल सागरेश्वर या ग्रंथात इथे समुद्र असल्याचा उल्लेख आढळतो. महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या आपल्या मालिकेत आज आपण याच देवराष्ट्रे येथील सागरेश्वर मंदिराची गाथा जाणून घेऊयात.
सागरेश्वर हे भगवान शंकरांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी एकूण ४८ मंदिरे असून त्यांमध्ये १०८ शिवलिंग विराजमान आहेत. हे मंदिर सातशे-आठशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे.
येथे सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर आहे. समुद्राच्या कृपेने गंगा तेथे वास करते अशी धारणा आहे. त्यावरूनच त्या परिसरास सागरेश्वर असे नाव पडले.
मध्यभागी असणारे देऊळ सर्वात प्राचीन असून ते समुद्रेश्वराचे अर्थात सागरेश्वराचे आहे. सागरेश्वराच्या मंदिरातील पिंडीवर ठेवलेली शाळुंका बाजूला केल्यानंतर खाली पाणी दिसते. मुख्य मंदिराशेजारी पाण्याची तीन कुंडे आहेत.
इतर देवता
मंदिराच्या परिसरात अन्य देवदेवतांचीही मंदिरे आहेत. तेथे अंबाबाई, उजव्या व डाव्या सोंडेचे गणपती, कार्तिकस्वामी, करकटस्वामी, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमेश्वर, सत्यनाथ, ओंकारेश्वर, वीरभद्रेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, नंदिकेश्वर, केदारेश्वर, सत्येश्वर, सिध्देश्वर, धोपेश्वर आदी ज्योतिर्लिंगाच्या मंदिरांबरोबरच इतर देवतांची मंदिरे पाहता येतात.
मंदिराची पौराणिक कथा
जेव्हा देव आणि दानव यांच्यात अमृत मिळवण्यावरून युद्ध सुरू होतं. तेव्हा ते थांबवण्यासाठी समुद्रमंथनातून निर्माण झालेले विष महादेवांनी प्राशन केले.
तेव्हा त्या विषाच्या प्रकोपाने महादेवांच्या अंगाची लाही लाही झाली. त्यानंतर त्यांनी सागरेश्वर येथील समुद्रात उडी घेतली आणि त्यांचा देह शांत झाला. त्यानंतर तिथे या मंदिरातील पवित्र लिंगाची निर्मीती झाली.
मंदिर स्थापनेची कथा
कुंडलेश्वर राज्याचा राजा सत्यवान शिकार करण्यासाठी अंबिका वनात आलेला. त्याला तहान लागली म्हणून तो पाण्याच्या शोधात भटकत होता. त्याला दोन ऋषी तप करताना दिसले.
त्यांच्याशी बोलण्याचा त्याने प्रयत्न केला. पण, ते ऋषी तपश्चर्या करण्यात मग्न होते. त्यांनी राजाकडे दुर्लक्ष केले.
बाजूलाच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील आळ्या राजाने ऋषींच्या अंगावर टाकल्या. त्यामुळे ऋषी क्रोधीत झाले. त्यांनी राजाला शाप दिला. कि तू दिवसा मनुष्य राहशील आणि रात्री तूझ्या अंगावर आळ्या भरतील.
राजा नाराज होऊन राजमहालात परतला. वनातून परतल्यापासून राजा नाराज होता. जेव्हा रात्र झाली तेव्हा राणीला या शापाची गोष्ट समजली. राणी राजाला पून्हा त्याच वनात घेऊन आली. त्याच ठिकाणी असलेल्या ऋषींकडे राजाने दया याचना केली.
त्यावर ऋषींनी राजाला माफ करून मंदिर परिसरात असलेल्या आडातील पाण्याने अंघोळ करण्यास सांगितली. राजाने अंघोळ केली आणि तो शापातून मूक्त झाला. शेवटी राजाने तिथे हेमाडपंथी मंदिर बांधले. तिथे तो नित्य पूजा करू लागला. त्यामुळेच सागरेश्वर परिसरातील इतर गावेही सदन आणि समृद्ध आहेत.
सागरेश्वर अभयारण्य
सागरेश्वर अभयारण्य सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ८६ चौ.किमी इतका आहे. अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे.
त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे. सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.