Mahashivratri 2024 : या मंदिरात प्रभू श्रीरामांनी बाण मारून काढलेल्या झऱ्यातून शिवलिंगाला आजही अभिषेक होतो!

कोल्हापूरात होते प्रभू श्रीरामांचे वास्तव्य!
Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 esakal
Updated on

Mahashivratri 2023 : भगवान शंकरांची महती असणारी अनेक ठिकाणे आहेत. पण, महाराष्ट्रात एक असे ठिकाण आहे जिथे प्रभु श्री राम आणि भगवान शंकर यांच्यामुळे चर्चेत आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले रामलिंग हे मंदिर प्रसिद्ध आहे.

१४ वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते. अशी माहिती पुराणात मिळते. आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत, गर्द वनराईत वसलेले हे रामलिंग मंदिर.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2024: कोंबड्यानं बांग दिली म्हणून शंकर पार्वती मातेचा मुक्काम कोल्हापूरातल्या या गावी झाला!

 प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे. चारी बाजूने हिरवळ, कडक ऊन्हात ही अल्हाददायी, शांत असे वातावरण आहे.

श्री रामलिंग मंदीर हे एका अखंड दगडात कोरलेले असुन याठिकाणी महादेवाच्या पिंडीची पुजाअर्चा केली जाते. प्रभू रामचंद्र १४ वर्षाच्या वनवासात असताना याठिकाणी त्यांचे वास्तव होते.

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023

काय आहे आख्यायिका

प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यास होते. तेव्हा त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली. त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले. पण, पाणी नसल्याने ते शक्य नव्हते. अशावेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला. त्यातून महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला. तो आजवर सुरू आहे.  

वनवासात असताना रामचंद्र इथे आले, त्यांनी इथे शंकराची आराधना केली आणि अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशी आख्यायिका. मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते.

Mahashivratri 2024
Mahashivratri Horoscope: महाशिवरात्रीच्या आधीच या राशींना येणार अच्छेदिन, जाणून घ्या

इथल्या मंदिराबाहेरचा सभामंडप पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागातल्या मंदिरांची अनुभूती देतो. सभामंडपात विठोबा रखुमाईची मूर्ती आहे. येथे गेली शंभरहून अधिक वर्षे अखंडपणे सुरू असलेले धुनी अग्निकुंड आहे. मुख्य स्थान गुहेत आहे.

गुहेत शिवलिंग आणि गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. गुहेत सर्वत्र पाणी झिरपते, त्यामुळे ओल असते.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2023: घरात सुख शांती आणि धनलाभ मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला 'हे' उपाय करा

गुहेच्या छताला मस्त लवणस्तंभ झालेले आहेत. बाहेर कुंड, त्यात अनेक मासे आणि कासवं. आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिरं आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहे.  वनराईत मोर, काळ्या तोंडाची वानरं खूप आहेत. मलिंगपासून(Ramling) पुढे त्याच डोंगरात असलेल्या धुळोबा – धुळेश्वरलाही जाता येते.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2023 :जाणून घ्या कधी आहे यंदा महाशिवरात्री...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.