MVA: मविआचे 'नवरत्न' सोडवणार जागा वाटपाचा तिढा, २०२४च्या निवडणुकीसाठी जबाबदारी या ९ जणांच्या समितीकडे

जागा वाटपाचा निर्णयायाठी स्थापन केला 9 सदस्यीय समिती
MVA
MVAEsakal
Updated on

महाविकास आघाडीने 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेना UBT यांच्यातील जागा वाटपाच्या सूत्रावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

तिन्ही पक्षांतील प्रत्येकी तीन नेत्यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे. ही समिती जागा वाटपावर चर्चा करेल आणि त्याचा मसुदा वरिष्ठ नेत्यांना सादर करेल, त्यानंतर ते दोन महिन्यांत निर्णय घेतील.

या समितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे बसवराज पाटील आणि नसीम खान, शिवसेनेचे(ठाकरे गट)खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आलेला आहे.

MVA
Maharashtra Politics: 'तू कोण आहे....', एकेरी उल्लेख करत श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

ऑगस्टमध्ये मुंबईत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत, लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या भागीदारांमध्ये राज्यनिहाय जागावाटपाचा निर्णय घेण्यात आला आणि समन्वय तसेच प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावर अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जागावाटपाचा निर्णय विशिष्ट राज्यातील आघाडीतील भागीदार राज्य पातळीवर घेतील, असे ठरले आहे.

कोणत्या पक्षाचा मतदारसंघाचा विद्यमान खासदार आहे आणि कोणत्या पक्षाला तो मतदारसंघ जिंकण्याची अधिक शक्यता आहे, हे लक्षात घेऊन समिती पक्षांना जागा वाटपाचा निर्णय घेईल. आम्ही जागा वाटप शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून आम्हाला निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळेल,” असं महाविकास आघाडीच्या नेत्याने सांगितलं आहे.

MVA
Pune Politics: मावळ लोकसभा ठाकरेंच्या वाट्याला? बारणेंना शह देण्यासाठी, भाजपचा जुना खिलाडी आखाड्यात

राष्ट्रवादीसह राजकीय निरीक्षकांच्या मते, 2019 मध्ये युती झाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तीन पक्ष सोबत असल्यामुळे जागावाटपा दरम्यान तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली.

मुंबईत, सेना यूबीटी एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार जागांवर निवडणूक लढवणार आहे.

MVA
Cabinet Expansions: नवरात्रीत मंत्रिमंडळ विस्ताराची वाटली जाणार खिरापत? तिन्ही पक्षांना विस्ताराची गरज मान्य

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती केली होती आणि युतीने 41 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 25 पैकी 22 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढवली आणि 18 जागा जिंकल्या होत्या.

राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या, तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी-AIMIM उमेदवार आणि अपक्षांनी प्रत्येकी एक एक अशी जागा जिंकली होती.

MVA
Mla Disqualification Case: तारीख पे तारीख! शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर, 'या' तारखेला होणार सुनावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.