तिन्ही पक्षात तुरळक मतभेद, तरीही महाविकास आघाडी..; काय म्हणाले अजित पवार?

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on
Summary

'तिन्ही पक्षात काही तुरळक मतभेद असले तरी भांड्याला भांडे लागतेच.'

कोयनानगर (सातारा) : सध्या महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi Government) तिन्ही पक्षात काही तुरळक मतभेद असले तरी भांड्याला भांडे लागते, त्याच प्रमाणं याही गोष्टी असतात. मात्र, जनहितासाठी महाविकास आघाडी भक्कम असल्याचं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोयनेत व्यक्त केलं. कोयनानगर (Koynanagar) विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी राज्याचे सहकार व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अजित पवार पुढं म्हणाले, 'कोयना धरणाला साठ वर्षे पूर्ण झाली. त्या काळात पुनर्वसन कायदे नव्हते, त्यामुळं या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांवर अन्याय झाला. मात्र, आता लवकरात-लवकर त्यांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस असून त्यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेऊन मागणी केली पाहिजे. अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन यासाठी जास्तीत-जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.'

Ajit Pawar
मुस्लिम पक्ष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार; काय म्हणाले ओवैसी?

मध्यंतरी कोरोनामुळं तब्बल दोन वर्षे विकासकामांवर विपरीत परिणाम झाला, त्याचाच एक भाग म्हणून कोयना धरण पायथ्याशी असणाऱ्या नव्या चाळीस मेगावॉट क्षमतेच्या वीजगृहाचे काम बंद आहे. लवकरच ऊर्जा व जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हे कामही पुढं नेलं जाईल. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोळसा टंचाई आहे, जलविद्युत प्रकल्प सोयीस्कर आहेत. राज्याला भविष्यात सौरऊर्जा प्रकल्पांवर ज्यादा लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. त्यामुळं स्वस्त दरात वीजनिर्मिती होईल. यासाठी मोठ-मोठे उद्योगपती, मोठे ग्रुप पुढे येत असल्याने यातूनच चांगले प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचा आमचा मानस आहे. तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात आम्हाला यश मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना इथं प्रदेशाप्रमाणं पर्यटन विकास करण्याचा आमचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.