Maharashtra Politics: महाविकास आघाडीला भगदाड! अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

maharashtra politics
maharashtra politicsesakal
Updated on

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या सोबतच राणे यांच्या उपस्थित महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

यामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे रामशेठ गावडे, जयश्री पलांडे, प्रिया पवार, सासवड राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप देवकर. अशा एकूण शंभर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मविआला एक प्रकारे धक्का बसला आहे.

maharashtra politics
NCP Politics: 'बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही' राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टचं सांगितलं

राज्यात महाविकास आघाडी तर्फे शिंदे सरकार विरोधात विभागानुसार वज्रमुठ सभेचे आयोजन केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण व्हावा आणि पुन्हा मविआचं सरकार यावं यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे यांची शिवसेना कामाला लागली आहे. मात्र तरी देखील राज्यातील मविआचे नेते कार्यकर्ते भाजप-शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत.

maharashtra politics
BJP Politics: 'उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला पण अजित पवारांसोबत...' भाजपच्या जेष्ठ नेत्याचं सुचक विधान

मागील आठवड्यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थकांनी, गावोगावचे सरपंच-उपसरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

खेड तालुक्यातील धानेारे येथील शाखा प्रमुखपदापासून राम गावडे यांनी 1991 पासून आपल्या राजकीय कारर्किदीस सुरुवात केली. पक्ष संघटनेतील बहुतेक सर्वच पदांवर काम करुन 2014 पासून तब्बल सहा वर्षे जिल्हाप्रमुख असलेले राम सदाशिव गावडे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.