विरोधी पक्षनेत्‍यांना नोटीस पाठवून सरकारने स्वत:ची कबर खोदली : नितेश राणे

राज्‍याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून महाविकास आघाडी सरकारने स्वत:ची कबर खोदली आहे.
नितेश राणे
नितेश राणे sakal
Updated on

कणकवली : राज्‍याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून महाविकास आघाडी सरकारने स्वत:ची कबर खोदली आहे. अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज केली. तसेच राज्‍याच्या अर्थसंकल्‍पात सिंधुदुर्गसाठी काहीही तरतूद झालेली नाही. त्‍यामुळे सिंधुदुर्गला काय मिळालं हे पालकमंत्री आणि इथल्‍या सत्ताधारी आमदारांनीच सांगावं असेही ते म्‍हणाले.

श्री.राणे यांनी पडवे येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, " देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून महाविकास आघाडीने मोठी चूक केली. देवेंद्र फडणवीस हे तुमचे बाप आहेत हे महाविकास आघाडी सरकारने विसरू नये. आयुष्यभर महाविकास आघाडीचे सरकार नसेल हे पोलिस प्रशासनानेही लक्षात घ्यावं. तत्‍कालीन पोलिस आयुक्‍त परमविर सिंग यांनी महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर काम केलं; पण ते अडचणीत असताना आता त्‍यांना वाचवायला कुणीही आलेलं नाही. तुम्‍ही ज्‍या ज्‍या गोष्‍टी करताय त्‍याची नोंद होतेय हेही लक्षात ठेवावं.

नितेश राणे
पुणे : बारामती वनपरिक्षेत्रात लवकरच सुरु होणार बिबट्या सफारी

ते म्‍हणाले, भाजपचा जो जो नेता सरकारच्या विरोधात बोलतोय, त्‍याला महाविकास आघाडी अडकविण्याचा प्रयत्‍न करतंय. संतोष परब हल्‍ला प्रकरण, आमच्या मुंबईच्या घराचं प्रकरण यात आम्‍हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्‍न केला. तसाच प्रकार आता भाजपच्या इतर नेत्‍यांविरोधात सुरू आहे; मात्र आघाडी सरकारने एक लक्षात घ्यावं की सुरवात तुम्‍ही केलीय आणि त्‍याचा शेवट मात्र भाजप करणार आहे. महाविकास आघाडी सरकारने सुशांतसिंग रजपूत, टीआरपी घोटाळा, कंगणा राणावत आदी प्रकरणांमध्ये मुंबईचे तत्‍कालीन आयुक्‍त परमविरसिंग यांचा वापर करून घेतला. त्‍यानंतर परमविर सिंग अडचणीत आल्‍यानंतर त्‍यांचा वाचवायला कुणीही आलेलं नाही. त्‍यांना स्वत:च लढावं लागतंय. यातून पोलीस प्रशासनाने काय तो बोध घ्यावा."

राणे म्‍हणाले, "राज्‍याच्या अर्थसंकल्‍पात कोकणासाठी कोणतीही नवी योजना अथवा निधीची तरतूद झालेली नाही. राणे कॅबिनेटमध्ये असताना कोकणसाठी भरभरून निधी येत होता. पण आता रस्ते, पर्यटन विकास आदी मूलभूत सुविधांसाठीही तरतूद झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी सिंधुरत्न योजना जाहीर केली. पण आत्ताच्या अर्थसंकल्‍पात या योजनेसाठीही निधीची तरतूद नाही. त्‍यामुळे गावोगावचे रस्ते, छोटे बंधारे यांची कामं होणार तशी कशी असा प्रश्‍न आहे.

"मोदींचे फोटो दाखवून शिवसेनेने मत मिळविली. १८ खासदार आणि ५६ आमदार निवडून आणले; मात्र आता सरकारने राजीनामा दिला. तर उत्तरप्रमाणे पेक्षाही खराब हालत शिवसेनेची होईल ." असं राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.