Ajit Pawar: अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार? पवारांना साद घातल्याची चर्चा

अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी उचललं पाऊल; शरद पवारांकडे प्रस्ताव दिल्याच्या चर्चा
Maharashtra politics
Maharashtra politics Esakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसुन येत आहेत. अशातच पक्ष बदलाचे आणि युतीच्या, सत्तेतील सरकार पडण्याच्या, नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चा राज्यात सुरू असताना मध्येच अजित पवार राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मी राष्ट्रवादीतच आहे आणि जीवात जीव असेपर्यंत इथच राहणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान या सर्व घडामोडी घडत असतानाच सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हंटलं त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी सत्तेसाठी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Maharashtra politics
Praniti Shinde: 'कर्नाटकामध्ये काँग्रेसची सत्ता येणार',आमदार प्रणिती शिंदे यांचा दावा

या सर्व चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी तुटते की काय अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. तर ही आघाडी तुटू नये यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता महाविकास आघाडी एकत्र राहण्याच्या दृष्टीने ठाकरे गटानेच पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.

Maharashtra politics
Election: विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे आव्हान

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणार वक्तव्य रविवारी केलं. अमरावतीत पत्रकारांशी बोलताना 2024 च्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सोबत लढेल काय? यात वंचित आघाडी पण एकत्र येईल का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना केला होता. यावर पवारांनी वंचित आघाडीशी आमची चर्चाच झालेली नाही. वंचितसोबत फक्त कर्नाटकातील जागांशिवाय चर्चा झाली. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल की नाही, हे आत्ताच कसे सांगणार? आज आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे पण एकत्र लढण्याची इच्छा पुरेशी नसते, जागांचे वाटप, त्यातले काही इश्यू आहेत, हे अजून केलेच नाही. तर कसे सांगता येईल, असे उत्तर त्यांनी दिलं आहे.

Maharashtra politics
Congress: कमी जागा काँग्रेसला अमान्य! नितीशकुमारांबाबत सावध भूमिका; किमान ३७० जागांचा श्रेष्ठींचा आग्रह

दरम्यान, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी टिकावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आली तर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याची तयारी दाखवली असून तसा प्रस्तावच त्यांनी दिल्याची चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीमध्ये कोणाला जागा कितीही आल्या तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल, अशी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना ग्वाही दिल्याच्या चर्चा आहेत. याबाबतचे वृत्त मुंबई तक या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Maharashtra politics
Pakistan Bomb Blast: पाकिस्तानात दहशतवादविरोधी विभागाच्या पोलीस स्टेशनवर बॉम्ब हल्ला! 12 कर्मचारी ठार, 50 जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.