'ज्या शिवसेनेनं दसरा मेळाव्याची सुरुवात केली आहे. त्यांनाच संधी मिळाली पाहिजे.'
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोरी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. त्यामुळं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं. त्यानंतर महाविकास आघाडी कायम राहणार का, अशी चर्चा सुरु असतानाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी युती अभेद्य असल्याचे संकेत दिलेत.
राज्यात आजदेखील महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आहोत. आमच्या बैठकाही एकत्रित होत असतात. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करीत आहोत, असं काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
बाळासाहेब थोरात यांनी आज मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, जेष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार, अनंत गाडगीळ, प्रशांत सुरसे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक आबा बागुल आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.
थोरात पुढं म्हणाले, आज देखील महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आहोत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करीत आहोत. दसरा मेळाव्याबद्दल होत असलेल्या चर्चाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा ही राजकारणाची बाब होण्याची गरज नाही. ज्या शिवसेनेनं दसरा मेळाव्याची सुरुवात केली आहे. त्यांनाच संधी मिळाली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.