Devendra Fadanvis Prees On Mahavitaran Strike : विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांसोबत चर्चेनंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
महावितरण कर्मचारी आणि राज्य सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आला आहे. चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. याममध्ये त्यांनी विविध मुद्दे सांगितले.
काय म्हणाले फडणवीस?
वीज वितरण कंपन्यांच्या ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली.
राज्य सरकारला कंपन्यांचं खासगीकरण करायचं नसल्याचेही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केले.
वीज कंपन्यांमध्ये सरकार ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
याशिवाय वयोमर्यादा वाढवून कर्मचाऱ्यांची भरती करणार.
याशिवाय अॅग्रीकल्चरमध्ये किती वीज जाते याची माहिती घेण्यात येणार.
कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सवलती वाढवण्यात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
येत्या तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.