महायुतीत ठिणगी! 'चंद्रशेखर बावनकुळेच खरे विलन'; शिंदे गटाच्या माजी खासदाराचा थेट आरोप

ShivSena VS BJP News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. महायुतीमधील नेते समोर येऊन उघडपणे बोलू लागले आहेत
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule
Updated on

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. महायुतीमधील नेते समोर येऊन उघडपणे बोलू लागले आहेत. शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना यावेळी रामटेकमधून तिकीट नाकारण्यात आलं होतं. रायटेकमध्ये शिवसेनेच्या राजू पारवेंचा पराभव झाला आहे. यावरून तुमाने यांनी भाष्य केलं असून चंद्रशेखर बावनकुळे हेच खरे खलनायक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तुमाने म्हणाले की, 'रामकेट शिवसेनेच्या हातून गेलं याचं दु:ख आहे. मी दोनवेळा या मतदारसंघातून विजयी झालो आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मी पराभव केला. पण, बावनकुळेंच्या सांगण्यावरुन माझं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे खरे विलन हे बावनकुळेच आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. याबाबतची तक्रार भाजप नेते अमित शहा यांच्याकडे करणार आहे.'

Chandrasekhar Bawankule
Ramtek Lok Sabha Election Results: पत्नीचं जातवैधता प्रमाणपत्र बाद ठरल्याने मिळाली संधी अन् श्याम बर्वेंनी 'रामटेक'वर झेंडा फडकावला

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून सर्व्हे करण्यात आला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांना याठिकाणी मी नको होतो. त्यामुळेच त्यांनी शिंदेंवर दबाव टाकला. तसेच अमित शहा यांना सांगून शिंदेवर दबाव टाकला आणि माझं तिकिट नाकारलं. पक्षाच्या सर्वेक्षणात माझ्या बाजूने ७६ टक्के मतं मिळाली होती, राजू पारवे यांना फक्त १ टक्के लोकांनी पसंती दिली होती. तरी, बावनकुळे यांच्या हट्टामुळे मला तिकीट नाकारण्यात आलं, असं तुमाने म्हणालेत.

Chandrasekhar Bawankule
Ramtek Lok Sabha Election Result : रामटेकच्या गडावर महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांनी तिरंगा फडकावला

ठाकरे गटातून बाहेर पडून आम्ही शिंदे गटात आलो. भाजपसोबत येण्यासाठी मी १२ खासदारांशी समन्वय साधला. तुमच्या सर्व १२ खासदारांना पुन्हा तिकिट दिलं जाईल, याबाबत माझी जबाबदारी असेल असं अमित शहा म्हणाले होते. आता अमित शहा यांच्याकडे जाऊन मी तक्रार करणार आहे, असं तुमाने म्हणाले आहेत. तुमाने यांनी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केल्याने महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत झाली. यात बर्वे यांनी बाजी मारली आहे. रामटेकमध्ये सुनील केदार विरुद्ध भाजप अशीच खरी लढत झाली असं म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.