Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

AJit Pawar: अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करून महाराष्ट्राला गतिशील करण्याचा संकल्प केला आहे.
 अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करून महाराष्ट्राला गतिशील करण्याचा संकल्प केला आहे.
sandhir sawarkarsakal
Updated on

Akola Latest News | महायुती सरकारने शेतकरी, वारकरी, युवा, मातृशक्ती, ज्येष्ठ नागरिकांना यांना समर्पित अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्याने व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करून महाराष्ट्राला गतिशील करण्याचा संकल्प केला आहे.

महिलाच्या सन्मानार्थ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना व अन्नपूर्णा योजना, वारकरी दिंडीला २० हजार रुपये व शेतकऱ्यांना मोफत वीज व राज्यातील १० लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देणाराव ज्येष्ठ नागरिकांच्या साठी तीर्थ योजना जाहीर करून विविध घटकांना न्याय देऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वासाने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असल्याचे सांगून राज्य सरकारचे अभिनंदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

 अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करून महाराष्ट्राला गतिशील करण्याचा संकल्प केला आहे.
Molestation Of School Girl In Akola: शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने, भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, कृष्णा शर्मा, माधव मानकर, संजय गोटफोडे, देवाशिष काकड आदी उपस्थित होते. ४३३ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये तसेच महाराष्ट्राच्या संस्कृती एकतेचा एकता बंधुभाव मानवतेचे प्रतिक पंढरपूर वारी जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे पाठविण्यात येणार आहे. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील मातृशक्तींसाठी योजना सुरु करण्याचा इतिहासिक निर्णय घेतला. लेक-लाडकी योजना तसेच शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करून स्वयंरोजगार निर्मितीसाठी पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून १० हजार महिलांना रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शुभ मंगल सामुहिक विवाहासाठी १० हजार वरून २४ हजार रुपयाची मदत, महिलांसाठी रुग्णवाहिका, कर्क रोग तपासणीसाठी साधन सामुग्री, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती लाभ व विविध योजना सुरु केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना संपन्न व समृद्ध करण्यासाठी बी-बियाणे अनुदान, एक रुपयात पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना, भाऊसाहेब फुंडकर फलोद्यान योजना, वैनगंगा-नळगंगा नदी जोड अभियानासह १० लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे.

 अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करून महाराष्ट्राला गतिशील करण्याचा संकल्प केला आहे.
Akola News: खबरदार, अल्पवयीन मुलांना दारू द्याल तर...राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इशारा

१९ महानगर पालिकांमध्ये ई-बस सेवा, शेतकऱ्यांना मदत, तसेच नुकसानाचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासठी ई-पंचनामा प्रणाली, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना, गाव तेथे गोदाम, कापूस आणि सोयवान, कांदा उत्पादकांना मदत, बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासोबतच धनगर, कामगार, अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना व महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे दृष्टीने राबवण्यात येणार आहेत. याशिवाय अकोल्यात एमआयडीसी (प्रादेशिक कार्यालय) देऊन सरकारने उद्योग धंद्याला चालना दिली अशी माहिती आमदार सावरकर यांनी पत्रकारांना दिली.

काही नवीन व प्रलंबीत विकास कामे मार्गी लागणार ः खा. अनुप धोत्रे

जिल्ह्यच्या विकासाच्या दृष्टीने काही नवीन व प्रलंबीत विकास कामे लवकरच मार्गी लागणार आहेत, अशी माहिती खा. अनुप धोत्रे यांनी दिली. प्रामुख्याने अकोला-खंडवा मार्गाचे नॅशनल हायवेत रुपांतर होत आहे. अकोल्यातील रेल्वे स्टेशनजवळील पूल शिकस्त झाला असून त्याठिकाणी नवा पूलाचा प्रस्ताव सादर केला आहे. याशिवाय भविष्यात वंदे भारत रेल्वेला अकोल्यात थांबा, विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच अकोलेकरांना दिलासा मिळेल. याशिवाय शेतकऱ्यांसाठी खास योजना प्रस्तावित केली असून यातून शेतकऱ्यांची उन्नती साधण्याचा प्रयत्न आहे, असेही खा. धोत्रे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.