Mahayuti seat-Sharing : विधानसभेत निवडणुकीसाठी १७० जागांवर भाजप आग्रही?राष्ट्रवादी काँग्रेस ८० तर शिंदे गटाचं काय?

Mahayuti seat-Sharing : देशात क्रमांक एकचा पक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने किमान १६० ते १७० जागा लढायला हव्यात, असे स्पष्ट मत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत राज्यपातळीवरील नेत्यांनी मांडले आहे.
Mahayuti seat-Sharing
Mahayuti seat-SharingEsakal

मुंबई: देशात क्रमांक एकचा पक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने किमान १६० ते १७० जागा लढायला हव्यात, असे स्पष्ट मत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत राज्यपातळीवरील नेत्यांनी मांडले आहे. याआधीच्या २०१९ च्या विधानसभेत भाजपने १६४ जागा लढविल्या होत्या.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून सुरू असलेला खोटा प्रचार मोडीत काढण्याचा निर्धारही यावेळी बोलून दाखविण्यात आला. आज समवेत असलेल्या दोन्ही मित्रपक्षांची ताकद महत्त्वाची असून त्यांच्याबरोवरच निवडणूक लढणे गरजेचे असल्याचेही पक्षाला वाटते.

Mahayuti seat-Sharing
Amravati News : खासदार बळवंत वानखेडे, यशोमती ठाकूर यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल; जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं भोवलं

महायुतीत जागावाटपाबाबतचा निर्णय केंद्रीय पातळीवर होणार असला तरीसुद्धा भाजपमध्ये आतापासूनच जागांचा अभ्यास सुरू झाला आहे. विदर्भ, मराठवाडा या दोन्ही भागांत पक्षासमोर आव्हाने आहेत. ती सोडवितानाच पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) असलेले वर्चस्व तसेच महामुंबई परिसरात शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळालेले यश या दोन्ही जमेच्या बाजू ठरतील असा अंदाज काही नेत्यांनी वर्तविला आहे.

शनिवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीबद्दल भाजप नेते काहीही बोलत नसले तरी जिल्हावार पक्षाची कामगिरी कशी? सुधारता येईल तसेच कोणत्या जागा लढणे? यश मिळवून देणारे ठरेल याबद्दल अत्यंत सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र प्रदेशचे आजी-माजी अध्यक्ष उपस्थित होते.

Mahayuti seat-Sharing
Weather Update : पुढील 24 तास महत्त्वाचे! या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

अधिवेशनाबाबत चर्चा

येत्या काही दिवसांत विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे तेथे काय भूमिका मांडायची? अंदाजपत्रकात साधारणतः कोणत्या गटांसाठी योजना करायच्या? याचा एक सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रित येऊन घेतील असे सांगण्यात येते. त्याआधी प्रत्येक पक्षाने त्यांना काय वाटते? तसेच अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींचा समावेश व्हायला हवा? याची मांडणी केली जात आहे. त्याबद्दल लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.

निष्ठावंतांना संधी द्या

विधानपरिषदेवर रिक्त होणाऱ्या जागा लक्षात घेता तेथे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांना संधी देण्यात यावी अशी अपेक्षाही कालच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये युतीमुळे पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्यांमध्ये लढाईची संधी मिळत नाही अशी भावना पसरली आहे त्यामुळे पक्ष विस्तारासाठी आजवर ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांना प्राधान्याने विधानपरिषदेवर पाठवावे असा विचार व्यक्त करण्यात आला. या संदर्भात काही नावांची चर्चाही झाली असल्याचे समजते ही नावे लवकरच दिल्लीला पाठविण्यात येणार आहेत

त्यांना पुन्हा संधी नको

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा अशी मागणी शिवसेनेने वारंवार केली आहे त्यामुळे याबाबतही तातडीने पावले उचलावीत असे मत व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊनच विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर या गटातील काही आमदार परत तर जाणार नाहीत ना? याकडेही लक्ष दिले जात असून त्यातील जे आमदार नाराज आहेत किंवा परतण्याच्या मनःस्थितीत आहेत त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली आहे. मराठा- ओबीसी वादावरही या बैठकीत चर्चा झाली.

Mahayuti seat-Sharing
NEET-UGC: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; लातूरमधून 2 शिक्षक ताब्यात

पंकजा मुंडे, दानवेंची उपस्थिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी शनिवारी रात्री चार तास भाजपच्या कोअर समितीची बैठक चालली. विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी लवकरच प्राथमिक ब्लूप्रिंट तयार करण्यात येणार असून त्याचा आराखडाही निश्चित करण्याचे यावेळी ठरले. या बैठकीमध्ये फडणवीस यांच्यासह, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रावसाहेब दानवे पाटील आणि पंकजा मुंडे हे सहभागी झाले होते.

ओबीसी समाजाचे आरक्षण जाऊ नये तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच सरकारची भूमिका आहे. सामंजस्यातून निघणारा मार्ग हा महाराष्ट्राच्या हिताचा ठरेल.ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनात सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com