Mahayuti Seat-Sharing Deal
Mahayuti Seat-Sharing DealEsakal

Mahayuti Seat-Sharing Deal: महायुतीचे जागावाटप तीन नेते ठरविणार; कोणत्या निकषाच्या आधारावर होणार जागावाटप? शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Mahayuti Seat-Sharing Deal: शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी जिंकायला आवश्यक असेल तोच जागावाटपाचा फॉर्म्युला असून, तोवर पक्षाकडून सांगितले जाणारे आकडे त्या पक्षातील चिंतन असेल, असे पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
Published on

महायुतीने महाराष्ट्राचे मैदान पुन्हा एकदा काबीज करावे, या एकमेव निकषावर जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या भेटीतच जागावाटपाबद्दल चर्चा होईल. चर्चेच्या या बैठकीच्या फेऱ्यांनंतर लगेच जागावाटप प्रत्यक्षात येईल, असा महायुतीच्या नेत्यांचा विश्‍वास आहे. शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी जिंकायला आवश्यक असेल तोच जागावाटपाचा फॉर्म्युला असून, तोवर पक्षाकडून सांगितले जाणारे आकडे त्या पक्षातील चिंतन असेल, असे पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या संबंधांत तीन नेते योग्य ती नावे निवडतील आणि त्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही बोलले जात आहे. २४ ,२५ किंवा २६ जून यापैकी कोणत्याही दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल ,असा तर्क आहे. मात्र या संबंधातील अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असून ते दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी तसेच महाराष्ट्रातील सहकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Mahayuti Seat-Sharing Deal
काही लोकांना बांबू लावायला पाहिजे, सकाळी-सकाळी भोंगा...; एकनाथ शिंदेंची नाव न घेता कोणावर टीका?

मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर?

भाजपतील शिस्तीमुळे तेथे मंत्रिमंडळ विस्तारासंबंधात जाहीरपणे भूमिका मांडली जात नसली तरी शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षामध्ये मते मांडली जात आहेत. येत्या काही दिवसातच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे उच्चपदस्थ सांगत आहेत तर विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर विस्तार होईल, असे एका बड्या नेत्याने सांगितले.

Mahayuti Seat-Sharing Deal
Weather Update : हायअलर्ट! पुढील काही तास महत्त्वाचे; या ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

भाजप १६० ते १७० जागांसाठी आग्रही?

देशात क्रमांक एकचा पक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने किमान १६० ते १७० जागा लढायला हव्यात, असे स्पष्ट मत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत राज्यपातळीवरील नेत्यांनी मांडले आहे. याआधीच्या २०१९ च्या विधानसभेत भाजपने १६४ जागा लढविल्या होत्या.

Mahayuti Seat-Sharing Deal
जिल्ह्यातील ‘या’ 5 मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा! लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या पक्षांतरामुळे महाविकास आघाडीसमोर मोहोळ, दक्षिण सोलापूर, करमाळ्याचा पेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.