Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिणी’साठी एक कोटी महिला इच्छुक;राज्य सरकारच्या योजनेला मोठा प्रतिसाद, अडीच कोटी नोंदणी होण्याचा अंदाज

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत तब्बल एक कोटी महिलांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. ही ऑगस्ट अखेरपर्यंत नोंदणीची ही संख्या दोन ते अडीच कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिणी’साठी एक कोटी महिला इच्छुक;राज्य सरकारच्या योजनेला मोठा प्रतिसाद, अडीच कोटी नोंदणी होण्याचा अंदाज
Updated on

मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत तब्बल एक कोटी महिलांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. ही ऑगस्ट अखेरपर्यंत नोंदणीची ही संख्या दोन ते अडीच कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर येत्या राखीपौर्णिमेदिवशी जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचा भत्ता जमा होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. यामध्ये २१ ते ६५ वर्षे वयापर्यंतच्या महिलांना दर महिना दीड हजार रुपयांचा भत्ता मिळणार आहे. योजना जाहीर झाल्यापासून या योजनेसाठी नोंदणी करण्याचा कार्यक्रम सरकारने सुरू केला. अडीच लाख रुपयांच्या मर्यादेत कुटुंबाचे उत्पन्न असणाऱ्या महिलांना हा भत्ता मिळणार असून एका कुटुंबातील दोन महिलासुद्धा यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेसाठी नोंदणी करताना अनेकदा सर्व्हर आणि नेटवर्कच्या अडचणी येत होत्या. मात्र आता ते ॲप बदलण्यात आले असल्याने सुलभतेने अर्ज भरले जात असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. महिला स्वतंत्रपणे स्वतःचे अर्ज भरू शकतात किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज भरू शकतात. त्याचप्रमाणे सेतू कार्यालयातही अर्ज भरता येऊ शकतो.

‘‘या योजनेसाठी अर्थसंकल्पात ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली, तरी पहिल्या टप्प्यासाठी दहा हजार कोटी रुपये या योजनेसाठी संबंधित विभागाला दिले आहेत. दोन कोटी पन्नास लाख महिलांची नोंदणी अपेक्षित असली, तरी त्यातील १० ते १५ टक्के अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची शक्यता आहे,’’ असे तटकरे यांनी सांगितले. सध्या ‘नारीशक्ती दूत’ या ॲपद्वारे अर्ज भरले जात असले, तरी महिना अखेरीपर्यंत नवीन पोर्टल सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातच अनेक बँकांनी महिलांचे स्वतंत्र बँक खाते उघडण्याची तयारी दाखविल्याने केवळ नवीन खाते आधारही जोडणी झाल्यानंतर या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मंत्र्यांनी दिलेली माहिती

  • नोंदणी केलेल्या महिलांमध्ये ६० टक्के महिला विवाहित

  • पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक नोंदणी

  • पुण्याखालोखाल ठाणे आणि नगर जिल्ह्यात नोंदणी

  • परराज्यातून विवाह करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांनी विवाह प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांनाही योजनेचा लाभ

सर्व कागदपत्रे जमा झाल्याशिवाय अर्ज संगणकाद्वारे अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना दिलेल्या आहेत. त्यामुळे छाननीमध्ये जास्त अर्ज बाद होणार नाहीत. छाननी पूर्ण झाल्यावर लाभार्थींची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

- आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.