Sharad Pawar: ...तर शरद पवारांना पंतप्रधान बनवून टाका; नाना पटोलेंचा PM मोदींवर पलटवार

NDAतील बैठकीत मोदींच्या काँग्रेसवरील टीकेवरुन पटोलेंनी पलटवार केला आहे.
Nana Patole
Nana Patole
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल NDAमधील महाराष्ट्रातील खासदारांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये बैठक घेतली. यावेळी त्यांनी शरद पवारांचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांना PM मोदींनी पंतप्रधान करावं असं म्हटलं आहे. (Make Sharad Pawar Prime Minister Nana Patole counterattack on PM Modi)

Nana Patole
Rahul Gandhi News : राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावर काल का बोलले नाहीत? अशी होती काँग्रेसची स्ट्रॅटजी

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणानं देशाचं नुकसान केलं आहे. या पक्षानं कायम आपल्या पक्षातील क्षमता असलेल्या नेत्यांना डावललं आहे. त्यामुळंच शरद पवारांना देखील पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, असं मोदींनी यावेळी म्हटलं होतं. (Marathi Tajya Batmya)

Nana Patole
World Tribal Day: अधिकारी-लोकप्रतिनीधींचे 'सेलिब्रेशन'; मात्र आदिवासी चिखलात अन् चुलीतून भिजलेल्या लाकडांच्या धूरात...

नाना पटोलेंनी केला पलटवार

मोदींच्या काँग्रेसवरील या आरोपांवर नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदींना जर शरद पवारांची इतकीच चिंता असेल तर त्यांनी पवारांना पंतप्रधान बनवून टाकावं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Nana Patole
Adhik Maas 2023: रामतीर्थावरील गर्दीत दिवसेंदिवस वाढ! अधिक मासातील शेवटचा आठवड्यात स्नानासह वाणासाठी गर्दी

दरम्यान, मोदींनी NDAच्या बैठकीत शिवसेनेवरही पहिल्यांदाच भाष्य केलं. आम्ही एकत्र निवडणूक लढवली तसेच एकत्र सत्तेत असतानाही शिवसेनेकडून टीक होतच राहिली, विनाकारण वाद उकरुन काढले गेले. ही टीका पण आम्ही सहन केली, अशा शब्दांत मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.