कुटुंबासाठी वेळ द्या, हा जन्म पुन्हा नाही! पैसा, संपत्तीच्या नादात मुलांचा रियल टाईम गमावू नका; मुले हाताबाहेर जावू नयेत म्हणून 'या' बाबी नक्की लक्षात ठेवा

मोबाईल, सोशल मीडिया अशा भौतिक साधनांच्या नादी न लागता कुटुंबातील पालकांनी आपल्या मुलांना वेळ द्यावा. जे पालक मुलांसोबत सुसंवाद ठेवतात त्याठिकाणी सकारात्मक विचार, ऊर्जा पाहायला मिळते. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून सकारात्मक विचारातून प्रगतीची वाट शोधल्यास निश्चितपणे रात्री शांत झोप लागेल.
solapur
happy family sakal
Updated on

सोलापूर : मोबाईल, सोशल मीडिया अशा भौतिक साधनांच्या नादी न लागता कुटुंबातील पालकांनी आपल्या मुलांना वेळ द्यावा. जे पालक मुलांसोबत सुसंवाद ठेवतात त्याठिकाणी सकारात्मक विचार, ऊर्जा पाहायला मिळते. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून सकारात्मक विचारातून प्रगतीची वाट शोधल्यास निश्चितपणे रात्री शांत झोप लागेल. झोपेसाठी कोणत्याही गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

सध्याच्या लाईफस्टाईलमुळे धकाधकीच्या काळात माणसाचे आयुर्मान कमी होत आहे. इयत्ता बारावीनंतर आपल्याला वेध लागते ते उच्चशिक्षण घेऊन नोकरी कधी लागणार व स्वत:च्या पायावर कधीपर्यंत उभारणार. वयाच्या पंचविशीनंतर विवाह, त्यानंतर काही वर्षांनी आयुष्यात मुलांचे आगमन, मुलांचे बालपण, त्यांचे शिक्षण आणि त्यांची नोकरी, असा प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात आपल्या आरोग्याचे प्रश्न, मुलांचे शिक्षण याकडे देखील आवर्जुन लक्ष देणे आवश्यक आहे.

मुलांकडे योग्य त्या वयात लक्ष देऊन त्यांच्याशी चर्चा केली, संवाद साधून त्यांना योग्य दिशा दाखविल्यास निश्चितपणे आपल्याला म्हातारपणी पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास देखील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

तुकाराम महाराज म्हणतात...

आपुलिया हिता जो असे जागता| धन्य माता पिता तयाचिया|| म्हणजेच सन्मार्गाने चालत असताना स्वहित साधण्याकरीता जो मनुष्य सतत प्रयत्न करीत राहतो, त्यास तुकोबा माउली ‘जागता’ म्हणजेच जागरूक मनुष्य अशी उपाधी देतात. स्वतःचा प्रापंचिक व पारमार्थिक उत्कर्ष करून घेणाऱ्या अशा मनुष्याचे माता पितादेखील अशा अपत्यांस जन्म देऊन जन्म सार्थकी झाला, ह्या हेतूने कृतकृत्य होतात, असे सात्विक कन्या-पुत्र ज्या कुळामध्ये जन्म घेतात. तेव्हा प्रत्यक्ष त्या श्रीहरीला देखील आनंद होतो.

पालकांनी ‘या’ गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवाव्यात

  • उन्हाळा सुटीत पालकांनी स्क्रिन टाईम करुन मुलांशी संवाद साधावा

  • ऑफिसची कामे कार्यालयीन वेळेतच पूर्ण करून घ्यावीत

  • ११ ते १६ या वयात मुलांची तार्किक व कल्पनाशक्ती वाढलेली असते, त्यावेळी त्यांना वेळ द्यावा

  • मुलींचे वय वाढत असताना त्या त्या वयात तिला योग्य तो सल्ला, मार्गदर्शन करावे

  • मुलांच्या हाती मोबाइल किंवा समोर टीव्ही न देता त्यांच्याशी दररोज पालकांनी संवाद साधावा

  • पैसा, संपत्ती कमावणे ही गरज कधीही संपत नाही, पण ते कमावताना आपली मुले हाताबाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी

...अन्यथा तुमच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच राहणार नाही

मोबाइल, सोशल मिडिया, टिव्हीच्या अतिवापरामुळे मुलांची कल्पनाशक्ती, तर्कशक्ती कमी होऊन मेंदु निष्क्रिय होतो आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या वेळेत पालकांनी मुलांना योग्य दिशा दाखवायला हवी. मुलांनी एकदा सांगायेच बंद केल्यास पुन्हा ते आपल्याला काहीच सांगत नाहीत. मुला-मुलींना वय वाढत असताना योग्य मार्गदर्शन केल्यास ते सोशल मिडियाचा किंवा चुकीच्या व्यक्तीचा आधार घेणार नाहीत, अन्यथा पश्चातापाशिवाय जीवनात काहीच शिल्लक राहत नाही.

- डॉ. विना जावळे, प्राचार्य, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.