पुणे: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या मोहम्मदवाडी, पुणे आणि शिक्रापूर बुरुंजवाडी येथील घरांवर छापे टाकले. दिवसभर ईडीकडून चौकशी सुरू होती. यानंतर काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीकडून मंगलदास बांदल यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर मंगलदास बांदल यांना मुंबईला मुंबईत आणण्यात आले आहे.