नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच मणिपूरमधून धक्कादायक घटना समोर आली होती. यावरून संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आली. आता महिला अत्याचाराच्या घटनेवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, मी मणिपूरच्या घटनेचा निषेध करते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. संसदेत चर्चेला सरकार तयार झाल्यानंतर विरोधक मागे गेले. त्याचं कारण म्हणजे, राहुल गांधी हे संसदेत नाहीत. त्यामुळे याच राजकारण केलं जातं असल्याचा आरोप वाघ यांनी केला.
दरम्यान सगळ्यांनी मिळून अशा घटनांना विरोध केला पाहिजे आहे. शिवाय मणिपूरबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या घटनांवर विरोधक बोलत नाहीत. मणिपूरवर बोललं जातं, पण माळदावर का बोललं जात नाही. माळदा पाकिस्तानात आहे का? ही विकृती आहे. ती पूर्णपणे ठेचली पाहिजे. एकूणच महिला अत्याचारावरून होत असलेलं राजकारण चुकीचं असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
ज्यावेळी विरोधीपक्षात होतो, तेव्हा मी सांगितलं होतं की, भाजपचं सरकार आलं तरी या घटना लगेच बंद होणार नाही. अशा प्रकरणात सरकार कारवाई करत का? हे महत्त्वाचं असतं. गुन्हे होतात, आणि ते आटोक्यात आणण्याचं काम सरकर करत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. मात्र अशा घटना होऊ नये यासाठी सर्वांना एकत्र येऊन लढलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.