मनमाडच्या गिर्यारोहकाचा शोध; अंकाई किल्ल्यावरील गुहेत नक्षीदार छत

मनमाडजवळील अंकाई-टंकाई किल्ल्याच्या पठारावरील गुहेत नक्षीदार दगडी छत (सिलींग) आढळले आहे.
मनमाडच्या गिर्यारोहकाचा शोध; अंकाई किल्ल्यावरील गुहेत नक्षीदार छत
Updated on

नाशिक : मनमाडजवळील अंकाई-टंकाई किल्ल्याच्या पठारावरील गुहेत नक्षीदार दगडी छत (सिलींग) आढळले आहे. माथ्यावर अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. या मंदिराजवळ सीता गुंफा आणि अगस्ती गुंफा आहे. त्याचठिकाणी आणखी एका गुहेत नक्षीदार दगडी काम दिसून येते. गुहेत अंधार असल्याने छताकडे सहसा लक्ष जात नाही.

गुहेत आतील बाजूला जणू एक छोटे घर दिसते. आतमध्ये दोन ते तीन खोल्या दिसतात. हा किल्ला सातमाळ रांगेत असून मनमाडपासून आठ किलोमीटर अंतरावर, तर समुद्र सपाटीपासून ३ हजार २०० फूट उंचीवर आहे. जोडदुर्ग असा उल्लेख परदेशी प्रवास वर्णनात उल्लेख आढळतो. समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून आयात-निर्यात व्यापार रस्ताच्या मार्गे औरंगाबाद-जालना-बऱ्हाणपूर, पैठण, सोलापूरशी चालायचा.

मनमाडच्या गिर्यारोहकाचा शोध; अंकाई किल्ल्यावरील गुहेत नक्षीदार छत
मुंबईत मेट्रोचे काम सुरु असताना अपघात; क्रेन ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

त्या व्यापारी मार्गावर हे किल्ले आहेत. बादशाह नामा ग्रंथात तसा उल्लेख आढळतो. देवगिरीच्या यादव राजवटीमधील हा किल्ला. खानदेशातील कळवण, बागलाण, मालेगावसह नांदगाव, चांदवड हे तालुके पेशव्यांनी होळकरांना दिले. यातील काही पेशव्यांनी स्वतःकडे ठेवले. त्यातील एक अंकाई-टंकाई किल्ला होय. इतिहासाचा साक्षीदार असलेला हा किल्ला अनेक गुपिते घेऊन उभा आहे.

पायथ्याजवळील जैन लेणी किल्ला ऐतिहासिक असल्याची साक्ष देतात. किल्ल्यावरील गुहा, पाण्याची तळी थक्क करणारी आहेत. किल्लेदारांचे निवास असलेला बालकिल्ला परिसरातील एकमेव कोरडा तलाव अभ्यासाचा विषय आहे. गुहेतील एका खोलीत प्रतिध्वनी ऐकू येतो. आपला आवाज घुमतो. गुहेच्या छतावर काळ्या पाषणात सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मनमाडमधील गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी हे दगडी ‘सिलींग'' शोधली आहेत.

मनमाडच्या गिर्यारोहकाचा शोध; अंकाई किल्ल्यावरील गुहेत नक्षीदार छत
बोपदेव घाटात चार अज्ञातांनी चाकूच्या धाकाने लुटले; चौघांवर गुन्हा

मी गेल्या २५ वर्षांपासून किल्यावर नेहमी येत असतो. किल्यावरील गुहा मला नेहमी आकर्षित करते. ही गुहा इतर गुहांपेक्षा वेगळी दिसते. आपण आत बोललो की आवाज घुमतो. गुहेची रचना पाहिल्यावर हे घर असावे आणि त्याठिकाणी ध्यान साधना होत असावी, असे जाणवते.

- प्रवीण व्यवहारे, गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.