मनोहर भिडे हे अफजल खानाचा वकील कृष्णाजीचे वंशज, त्यामुळे बदललं नाव; यशोमती ठाकूर यांचा दावा

Manohar Bhide and Yashomati Thakur
Manohar Bhide and Yashomati Thakur
Updated on

मुंबई - शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केले. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Manohar Bhide and Yashomati Thakur
Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांचा पंतप्रधान मोदींबाबत खळबळजनक विधान; म्हणाले निवडणुकीआधी...

मनोहर भिडे हे मनोहर कुलकर्णी नावाचा मनुष्य आहे. हे एवढे विचित्र बोलतायत, तरी त्यांना अटक का केली जात नाही? असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. पुढे त्या म्हणाल्या की मी माहिती घेतली, या व्यक्तीने नाव का बदललं. त्यानंतर मला असं सांगण्यात आलं की, मनोहर कुलकर्णी हे अफजल खानाचा वकील कुष्णाजी कुलकर्णी यांचे वंशज आहे. त्यामुळे त्यांनी नाव बदललं.

Manohar Bhide and Yashomati Thakur
Sanjay Raut: हे आम्ही त्यांना सांगायला नको.. मोदी-पवार भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्याची रोखठोक प्रतिक्रिया

दरम्यान नाव बदलून देखील कृती काही बदलली नाही. हे आज महात्मा ज्योतिबा फुले, पंडीतजी, महात्मा गांधीजींच्या आईबाबत, साईबाबा आणि भगवान श्रीकृष्णावर बोलले. तरी त्यांच्यावर थातूरमातूर गुन्हा दाखल केला. भिडेंना अटक झाली पाहिजे, तडीपार केलं पाहिजे एवढच नाही, देशातून बाहेर काढलं पाहिजे, अशी मागणीही ठाकूर यांनी केली.

यशोमती ठाकूर यांनी भिडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच तुमचा दाभोळकर करू, असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ठाकूर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.