Manohar Joshi Discharge: मनोहर जोशींच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं.
Manohar-Joshi
Manohar-JoshiEsakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या प्रकृतीतच चांगलीच सुधारणा असल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनानं याबाबत अधिकृत निवेदनाद्वारे याची माहिती दिली. (Manohar Joshi Discharge from Hinduja Hospital good improvement in his health)

Manohar-Joshi
Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील कॅन्टिनच्या चहामध्ये आढळल्या अळ्या!

मनोहर जोशी हे सध्या ८५ वर्षांचे वर्षांचे आहेत. वाढत्या वयामुळं त्यांच्या प्रकृतीत चढउतार सुरु आहेत. पण गेल्या महिन्यात २३ मे २०२३ रोजी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीरही बनली होती.

Manohar-Joshi
Sakal Mahabrands 2023: गरीबी कशी दूर होईल? फडणवीसांनी पाच वाक्यात सांगितला उपाय

पण नंतर ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्यानं आणि स्वतःहून श्वास घेण्यास त्यांना अडचण येत नसल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं नव्हतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून स्थिर असल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Manohar-Joshi
Sakal Mahabrands 2023: सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे ब्रँड - फडणवीस

गेल्या काही वर्षांपासून जोशी राजकारणापासून दूर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील जोशी सर म्हणजे पहिल्या फळीतील नेते आहेत. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारचे ते मुख्यमंत्री होते. त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. मनोहर जोशी यांनी आतापर्यंत नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.