Manoj Jarange : ''असल्या कमेंट वाचून 'त्या' दोघांना भाकरी कशी जात असेल'', मनोज जरांगेंची खरमरीत टीका

Manoj Jarange
Manoj Jarangeesakal
Updated on

जालनाः जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मेळावा संपन्न झाला. मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी लाखोंचा जनसागर जमला होता. भाषणामध्ये जरांगेंनी सरकारला १० दिवस उरले असल्याची आठवण करुन दिली. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असं ते म्हणाले.

जरांगे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात ४० दिवसांपैकी ३० दिवस झालेत अजून १० दिवस उरले आहेत. आज हा लाखोंचा जनसागर अंतरवालीत उसळला आहे, त्यांचं एकच म्हणणं आहे.. राहिलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा.

Manoj Jarange
Manoj Jarange: नावासोबत पाटील लावता, मग आरक्षण कशाला हवं? गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना सवाल

सभेनंतरदेखील मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, दोन येडपट आमच्यामागे लावले आहेत. आमच्यातले दोनच पोरं त्यांना पुरुन उरतील. त्यांना खाली कमेंटमध्ये दिलेल्या शिव्या वाचल्या तर दिवसभर भाकर खाऊ वाटणार नाही. ते कसे खात असतील त्यांचं त्यांना माहिती. कदाचित त्यांना त्याची सवय असेल, अशी खरमरीत टीका मनोज जरांगेंनी केली.

जमलेल्या गर्दीबद्दल बोलताना जरांगे म्हणाले की, लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी आरक्षण सभेसाठी हजेरी लावली आहे. मला काहीजण म्हणत होते जमलेली गर्दी माघारी पाठवणं अवघड आहे. मात्र मराठ्यांनी दिलेला शब्द पाळला असून शांततेच्या मार्गाने माघारी गेले आहेत.

Manoj Jarange
ठार मारण्याच्या धमकीनंतर 'तुला मराठ्यांनी मोठं केलं' म्हणणाऱ्यांना भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले, मला मोठं केलं ते...

7 कोटी रुपयांच्या आरोपांना दिलं उत्तर

''माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, असं आधी बोलणारे छगन भुजबळ आता विरोधात बोलत आहेत. ते आता फडफड करत आहेत, सभेला ७ कोटी रुपये खर्च आल्याचे भुजबळ म्हणाले होते. मात्र सभेसाठी १०० एकर जमीन शेतकऱ्याने फुकट दिली, येऊन विचार'', असा घणाघात मनोज जरांगेंनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.