Manoj Jarange : वडेट्टीवारांच्या अश्रूंवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; मराठा नेत्यांना उद्देशून म्हणाले...

गुरुवारी लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी सुरुवातीला बोलणंच टाळलं होतं. भावनिक झालेल्या वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन फिरवला.
Manoj Jarange : वडेट्टीवारांच्या अश्रूंवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; मराठा नेत्यांना उद्देशून म्हणाले...
Updated on

छत्रपती संभाजी नगरः मराठवाड्यामध्ये एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण तात्पुरतं थांबवलं आहे तर दुसरीकडे ओबीसींच्या हक्कांसाठी लक्ष्मण हाके हे उपोषण करीत आहेत. त्यांच्या उपोषणाला आठवडा लोटला आहे.

गुरुवारी लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी सुरुवातीला बोलणंच टाळलं होतं. भावनिक झालेल्या वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन फिरवला.

Manoj Jarange : वडेट्टीवारांच्या अश्रूंवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; मराठा नेत्यांना उद्देशून म्हणाले...
Anil Parab : ''शिवसेनेने नोंदवलेली नावं बाद तर भाजपने नोंदवलेली नावं कायम'', अनिल परबांचा आक्षेप

मनोज जरांगे पाटील यांनी वडेट्टीवारांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आमचे लोक आरक्षणासाठी आत्महत्या करुन मेले तरी आमच्या नेत्यांच्या डोळ्याला थेंब आला नाही. वडेट्टीवारांची भावनिकती ही कौतुक करण्यासारखी आहे.

विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनस्थळावरुन मुख्यमंत्र्यांना फोन फिरवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय उद्या (शनिवार) राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पाठवत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Manoj Jarange : वडेट्टीवारांच्या अश्रूंवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; मराठा नेत्यांना उद्देशून म्हणाले...
Nashik News : शिवसेनेच्या कोकणे यांची गाडी फोडली! खासदारांसह शिष्टमंडळाने दिले पोलीस आयुक्तांना निवेदन

टिकणार नाही तर आश्वासन कशाला देता?- वडेट्टीवार

वडेट्टीवार म्हणाले की, सगेसोयऱ्यांबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी ते टिकणार नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे. असं असेल तर नोटिफिकेशन काढता कशाला, राज्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न का करता? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.