Manoj jarange-Patil: "सरसकट करता येणार नाही, मात्र..."; मनोज जरांगेंना अध्यादेश दिल्यानंतर फडणवीस काय म्हणाले?

Manoj jarange-Patil: महाराष्ट्रात सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन संपले आहे. मनोज जरंगे पाटील यांनी आज (शनिवार) आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले आहे.
Manoj jarange-Patil
Manoj jarange-Patil
Updated on

Manoj jarange-Patil

महाराष्ट्रात सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन संपले आहे. मनोज जरंगे पाटील यांनी आज (शनिवार) आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले आहे. महाराष्ट्र सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार नवीन अध्यादेश दिला आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आधीपासूनच सांगत होते की कायदेशीररीत्या आरक्षण द्यावे लागले. संविधानाच्या आत राहून आरक्षण द्याव लागले, हे मी आधीपासून सांगत होते. हा मार्ग मनोज जरांगेंनी स्विकारला आहे. सरसकट आपल्याला करता येणार नाही. मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना आपल्याला प्रमाणपत्र देता येईल. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत. (Maratha Reservation News in Marathi)

ओबीसींवर अन्याय होणार नाही. राज्यातील सर्व समाजला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. छगन भुजबळ यांनी सांगू इच्छितो की ओबीसींवर अन्याय होईल, असा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दुर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत, पुरावा नाही. त्या लोकांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय नाही. Manoj jarange-Patil

Manoj jarange-Patil
Donald Trump Defamation Case: निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना मोठा झटका! मानहानीच्या खटल्यात लेखिकेला ६९२ कोटी रुपये देण्याचे आदेश

ज्या लोकांचा कायदेशीर दुष्ट्या अधिकार होता पण त्यांना आरक्षण देता येत नव्हतं, अशी कार्यपद्धती आपण सोपी केली. या गोष्टींचा अभ्यास केल्या वर छगन भुजबळ यांचे समाधान होईल, असे फडणवीस म्हणाले. दोन्ही बाबी सुरू असतील. मोठा समाज आहे. सर्वेक्षण सुरु आहे. क्युरेटिव्ह मध्ये मार्ग निघाला नाही तर दुसरा मार्ग म्हणजे सर्वेक्षण सुरू आहे. क्युरेटिव्हीमध्ये सकारात्मक मार्ग निघेल अशी आशा आहे, असे फडणवीस म्हणाले. Manoj jarange-Patil

गुन्हे मागे घेण्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले,  "गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे, पण यात घर जाळणे, थेट हल्ला, हे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत. इतर आंदोलन गुन्हे मागे घेऊ"

Manoj jarange-Patil
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'इंडिया आघाडी' जागावाटप ठरलं! काँग्रेस लढणार 'इतक्या' जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.