Manoj Jarange apologizes to CM Eknath Shinde and Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करण्यात आले होते. यावरून जरांगे पाटील यांच्यावर टीका देखील होत आहे. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आई-बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यावेळी अनावधानाने होतं. ते अमरण उपोषण आहे त्यामध्ये ते झालं. आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील. दिल्या असतील तर त्यांनी ते विधानसभेत देखील घेतलं असं मला कळलं. ते विधानसभेच्या पटलावर हे बोलले असतील... मी बाहेरून ऐकलं..... मी आई-बहिणीवरून बोललेलं शिंदे यांना देखील लागलं असेल तर तेवढे शब्द मी मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. आई-बहिणींपेक्षा मोठं काय आहे आपल्याला? आपण छत्रपतींचे विचार चालवणारे आहोत.... आई-बहिणींबद्दल तोंडाने अनावधानाने शब्द गेले असतील तर ते शब्द मागे घेतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान आर्थसंकल्पीय अधिवेशनात आज जरांगेंच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. तर आमचीही हीच मागणी आहे, असं विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान विधानसभेत बोलताना या आंदोलनाच्या मागे कोण आहे आणि जरांगे यांचा बोलवता धनी कोण आहे हे पाहणं गरजेचं असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.