"जनतेचे पैसे खाल्ले अन् दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले"; मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Manoj Jarange
Manoj Jarange
Updated on

Manoj Jarange attack on chhagan Bhujbal: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना चांगलेच फटकारले. छगन भुजबळ यांनी आंतरवाली येथील सभेसाठी सात कोटी खर्च केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आज आंतरवाली सराटी येथील सभेतून मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी सभेच्या खर्चाच्या पैशांचा हिशोब देखील दिला.

माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही म्हणणारे छगन भुजबळ आता विरोधात बोलत आहेत. ते आता फडफड करत आहेत. सभेला ७ कोटी रुपये खर्च आल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मात्र सभेसाठी १०० एकर जमीन शेतकऱ्याने फुकट दिली, येऊन विचार, असे मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांना म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "भुजबळ म्हणतात लोक १० रुपये देत नाहीत. त्यांना देत नसतील आम्हाला देतात. तुम्हाला का देत नाहीत मी सांगतो. गोरगरीब मराठा जनतेन तुम्हाला मोठं केलं. त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला म्हणून तुमच्यावर धाड पडली. जनतेचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले अन् ते आम्हाला शिकवतात."

Manoj Jarange
Monoj Jarange Sabha : सरकारकडे फक्त १० दिवस उरलेत, अन्यथा...; अंतरवलीत मनोज जरांगे गरजले!

"१२३ गावातून आम्ही निधी जमा केले. आम्ही घाम गाळतो. महाराष्ट्रातील मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता. पण इतर गावांकडून आम्ही पैसे घेतले नाही. भुजबळांना आम्ही ऑन कॅमेरा हिशोब द्यायला तयार आहोत", असे जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

"ते (छगन भुजबळ) जनतेचे पैसे खातात आणि वावार विकत घेतात. आम्ही ७ कोटी रुपये बघितले देखील नाहीत. अजित पवार उपमुख्यमंत्री आहात त्यांनी छगन भुजबळांना जरा समज द्यावा, नाहीतर मी असा मागे लागले की मी सोडत नाही", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना दिला. 

Manoj Jarange
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी नोंदीच्या खुलाशासाठी जाणकारांचा समितीकडून आधार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()