Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेले असलेले मनोज जरांगे यांनी राज्याच्या दौरा केला. सरकारला दिलेली ४० दिवसांची मूदत संपली आता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. आज आज आंतरवाली सराटी येथे जरांगेंची जाहीर सभा होणार आहे.
या सभेपूर्वी वकील गुणरत्न सदावर्तें यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी संभाजीनगर पोलिसांना पत्र दिले होते. मनोज जरांगे पाटील यांची सभा हिंसक होईल म्हणून त्यांना अटक करावी, असं गुणरत्न सदावर्तें पत्रात म्हटले होते. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या मालकांनी समज द्यावी असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. गुणरत्न सदावर्ते हे कोणाचे पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो असंही जरांगे पाटील म्हणाले.
हे हास्यास्पद आहे. त्यांच्या मालकांचे देखील असेच स्टेटमेंट होते की पोलिसांवर अन्याय झाला. ते गप बसले आता गुणरत्न सदावर्ते यांना समोर केले. १०६ आमदार तुम्हाला यासाठी निवडून दिले होते का? मराठा समाज देखील गरजेचा आहे. त्यांची ताकद तुम्हाला दिसेल. आपण एका पक्षाचे मोठे नेते आहात. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात. त्यामुळे सदावर्तेंना समज द्यावी, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)
एक मराठा लाख मराठा घोषणा द्यायची आणि मराठ्यांना विरोध करायचा असं काही नेत्यांचं धोरण आहे. गोरगरीबांचं आरक्षण रद्द करुन त्यांच्या ताटात विष कसं कालवायचं हे नेत्यांना माहित आहे. जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले गुणरत्न सदावर्ते आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते टीव्ही ९ मराठीसोबत बोलत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.