Manoj Jarange : जरांगेंच्या मुंबईतील आमरण उपोषणाच्या घोषणेवर बच्चू कडूंची सडेतोड भूमिका; म्हणाले, पायी मोर्चा...

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आता चलो मुंबईचं आवाहन केलं आहे.
Maratha Andolan Bachchu Kadu and Manoj Jarange
Maratha Andolan Bachchu Kadu and Manoj Jarange
Updated on

मुंबई : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आता चलो मुंबईचं आवाहन केलं आहे. त्यासाठी आंतरवालीतून मुंबईतील आझाद मैदान आणि शिवाजी पार्क इथं पायी मोर्चा काढून इथं आमरण उपोषण सुरु करणार आहेत. जरांगेंच्या या घोषणेवर दिव्यांग विभागाचे मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Manoj Jarange hunger strike in Mumbai azad maidan Bachu Kadu gives support him)

Maratha Andolan Bachchu Kadu and Manoj Jarange
Covid JN.1: कोविडचा नवा व्हेरियंट देशभरात वेगानं का पसरतोय? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं कारण

जरांगेंच्या सोबत आहोत

बच्चू कडू म्हणाले, आम्ही मनोज जरांगेंच्या सोबत आहोत. आंतरवाली ते मुंबई पायी मोर्चा ते काढणार आहेत, त्यात देखील आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. मराठा समाजाचे ट्रॅक्टर जरी सरकारनं अडवले तरी त्यावेळी आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत. (Marathi Tajya Batmya)

Maratha Andolan Bachchu Kadu and Manoj Jarange
Video: शिवराज सिंहांनी कार्यकर्त्याच्या पायात घातले बूट! भाजप सत्तेत येण्यासाठी केला होता कठीण संकल्प

हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर जरब असावी

हिंसक आंदोलन ते करणार नाहीत हा चांगला निर्णय आहे. हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर जरब असली पाहिजे, त्यामुळं मला वाटतं त्यांनी चांगली भूमिका मांडली. एवढी मोठी ताकद त्यांच्यासोबत असताना हिंसक आंदोलन करण्याची गरज नाही. (Latest Marathi News)

Maratha Andolan Bachchu Kadu and Manoj Jarange
PoK Elections : पीओकेत राखीव जागांच्या शहांच्या घोषणेनंतर तिथं निवडणुका होतील का? परराष्ट्र मंत्यांनी स्पष्टच सांगितलं

कार्यकर्ता म्हणून भूमिका बजावू

सरकारचं शिष्टमंडळ नुकतंच त्यांच्याशी बातचीत करुन गेलं होतं. पण यानंतरही कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भूमिका बजावू आणि कशा पद्धतीनं सामाजाला अधिक चांगला फायदा होईल याचा प्रयत्न करु. जरांगेंना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की पुढे कसं जायचं? असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.