Manoj Jarange : मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ,जरांगे

राज्यात नोंदी सापडलेल्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेच पाहिजे. यातून नोंदी न सापडलेले काही मराठे शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मागेल त्या मराठ्याला सरकारने कुणबी प्रमाणपत्र द्यावे,’’ अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
Manoj Jarange
Manoj Jarangesakal
Updated on

लातूर : ‘‘राज्यात नोंदी सापडलेल्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेच पाहिजे. यातून नोंदी न सापडलेले काही मराठे शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मागेल त्या मराठ्याला सरकारने कुणबी प्रमाणपत्र द्यावे,’’ अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मराठा आणि ‘ओबीसी’ यांच्यात दंगल घडवण्याचा छगन भुजबळ यांचा डाव होता. मराठा समाजाने तो हाणून पाडला, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी येथे मोठी शांतता फेरी काढण्यात आली. त्यानंतर सभेत जरांगे बोलत होते. ‘‘मराठ्यांच्या विरोधात छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र आणले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे पाठबळ आहे. मंत्री गिरीश महाजन हे सग्यासोयऱ्याचे प्रमाणपत्र टिकणार नाही असे सांगत आहेत. असे असेल तर अंतरवाली सराटी येथे आरक्षणाचे अभ्यासक, आयोगाचे अध्यक्ष, अधिकारी कशाला आणले होते? खोटी माहिती देऊन समाजात गैरसमज पसरवू नका. मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांचा आम्ही कार्यक्रम करू,’’ असा इशारा त्यांनी दिला.

भुजबळांचे स्वप्न पूर्ण होणार नाही

‘‘अंतरवाली सराटीसह इतर ठिकाणी ओबीसी समाजाची फेरी काढायची. त्यात दगडफेक करायला लावायची व ती दगडफेक मराठा समाजाने केली असे दाखवायचे. यातून मराठा व ओबीसी समाजात दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न भुजबळ यांचा होता,’’ असा आरोप जरांगे यांनी केला. त्यांचा हा प्रयत्न मराठा समाजाने हाणून पाडला आहे. भुजबळांनी कितीही प्रयत्न केले तर त्यांचे स्वप्न साकार होणार नाही, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.