पोरांना खोट्या केसेसमध्ये गुंतवलं जातंय, मराठ्यांच्या नेत्यांनी लक्ष द्यावं अन्यथा...; मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील मराठा नेत्यांना इशारा दिला आहे
Manoj jarange maratha leaders over police cases on protesters Maratha reservation Chhagan Bhujbal
Manoj jarange maratha leaders over police cases on protesters Maratha reservation Chhagan Bhujbal
Updated on

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ हे आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान राज्यातील ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले असून मनोज जरांगे यांच्या विरोधात ते भूमिका घेताना दिसत आहेत. यावर मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केलं. सरकारचं शिष्टमंडळ तारखेच्या टाइमबाँडसाठी आज ऐवजी उद्या भेट घेणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मराठ्यांनी शांततेत आणखी जास्त एखजूट वाढवावी. तसेच महाराष्ट्रातील मराठ्यांचे नेत्यांनी एक विनंती आहे की, जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे असं दिसतंय. कारण जे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांच्या पोरांना खोट्या केसेसमध्ये गुंतवलं जात आहे. याकडे मराठ्यांच्या नेत्यानी लक्ष ठेवावे, कारण उद्या या पोरांची तुम्हाला गरज आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही मदत नाही केली तर हे मराठ्यांचे पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत असे मनोज जरांगे म्हणाले.

Manoj jarange maratha leaders over police cases on protesters Maratha reservation Chhagan Bhujbal
Maratha Reservation: कोणत्या दुकानात शिरायचं अन् बाहेर पडायचं हे भुजबळांना चांगलं माहितेय; जरांगेंचा निशाणा

षडयंत्र काय आहे?

मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, मला रात्री अशी माहिती मिळाली, ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईल. पण बीडचे काही बांधव काल येथे आले होते, त्यांनी सांगितलं की भुजबळांच्या पाहुण्यांचं फुटलेलं हॉटेल हे त्यांच्याच पोरांनी फोडलं आहे आणि ते अटक सुद्धा आहेत अशी खात्रीलायक माहिती मला मिळाली आहे.

Manoj jarange maratha leaders over police cases on protesters Maratha reservation Chhagan Bhujbal
Maratha Reservation : सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध; भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका, जरांगेंवर टीका

मी याआधीही म्हणालो होतो की मराठे शांततेत आंदोलन करत आहेत. यामध्ये सत्ताधाऱ्यांचेच लोकं मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात हे तंतोतंत खरं ठरत आहे.

जसं की भूजबळ साहेबांच्या पाहूण्याचं हॉटेल त्यांच्याच समाजातील जवळच्या लोकांनी फोडलं अशी ऐकीव माहिती मला मिळाली. तसेच महाराष्ट्रात देखील असा अंदाज दिसतोय की एकमेकांनी पूर्वीच्या द्वेषाने एकमेकांची घरे फोडली, दगडफेक केली. मराठ्यांच्या लोकांना जाळपोळीशी काही देणंघेणं नाही असेही जरांगे यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.