Manoj Jarange : ''वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या'', मनोज जरांगेंनी दिले दोन महिने

Maratha Reservation Manoj Jarange patil
Maratha Reservation Manoj Jarange patilesakal
Updated on

आंतरवाली सराटीः राज्य सरकार जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असेल तर आम्ही वेळ द्यायला तयार आहोत, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.

धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, संदीपान भूमरे या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी येथे गेलं होतं. त्यापूर्वी दोन माजी न्यायमूर्तींनी त्यांच्याशी चर्चा केली होती.

शिष्टमंडळाची शिष्टाई फळाला आलेली असून मनोज जरांगे पाटील यांनी दोन पावलं मागे येत सरकारला वेळ देण्याची भूमिका घेतली आहे.

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन शिष्टमंडळाने दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देण्याची भूमिका जाहीर केली आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे, या मताचा मी आहे. हा आरक्षणाचा लढ जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरुच राहणार असेल. सरकारने दिलेला शब्द पाळावा, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत असं जरांगेंनी जाहीर केलं.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी २४ डिसेंबर २०२३ पर्यंतची वेळ सरकारला दिली असून तोपर्यंत सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.