मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी यात्रा काढली जाणार आहे. तसेच मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आज सकाळपासून अंतरवाली सराटी गावात मराठा समाज बांधव जमा होण्यास सुरू झाले आहेत. यादरम्यान राज्य सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा आंदोलक आज मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. आज दुपारी तीन वाजता मंख्यमंत्र्याचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावर अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मनोज जरांगे आणि मराठा बांधव मुंबईत धडकण्याआधीच सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढणार का? हे पाहावे लागणार आहे.
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील आज (20 जानेवारी) रोजी मुंबईला रवाना होणार आहेत. त्यांनी मुंबईच्या दिशेने मिळेल ते वाहन घेऊन शांततेने चला असे अवाहन मराठा बांधवांना केले आहे. मुंबईला निघण्यापूर्वी आंदोलनाचा संपूर्ण टाईम टेबल जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कोणत्या तारखेला नेमके काय करायचे याची विस्तृत माहीती आज मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती
कसा असेल मनोज जरांगे यांच्या यात्रेचा संपूर्ण प्रवास? ( Manoj Jarange March to Mumbai Complete Schedule)
२० जानेवारी - पहिला दिवस : अंतरवाली ते मातोरी.
अंतरवालीतून पायी-वाहन यात्रेला सुरुवात होईल. अंतरवालीतून सकाळी ९ वाजता शुभारंभ होऊन, कोळगाव ता. गवराई येथे दुपारचे जेवण होईल, मातोरी ता. शिरूर येथे मुक्काम व जेवण.
२१ जानेवारी - दुसरा दिवस : मातोरी ते करंजी बाराबाभळी.
मातोरीतून सकाळी ८ वाजता निघणार, तनपुरवाईला आणि पाथर्डी येथे दुपारचे जेवण, बाराबाभळी-कारंजी बाट ता. नगर येथे मुक्काम / जेवण होईल.
२२ जानेवारी - तिसरा दिवस : बाराबाभळी ते रांजणगाव.
बाराबाभळीतून सकाळी ८ वाजता निघणार, सुपा ता. पारनेरे दुपारी जेवण, रांजणगाव ता. शिरूर येथे मुक्काम/जेवण.
२३ जानेवारी - चौथा दिवस : रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास.
रांजणगावातून सकाळी ८ वाजता, कोरेगाव भिमा येथे दुपारी जेवण, चंदनगर-खराडी बायपास मुक्काम/जेवण होईल.
२४ जानेवारी - दिवस पाचवा : खराडी बायपास ते लोणावळा.
चंदन नगर, खराडी बायपास येथून सकाळी ८ वाजता निघणार, तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण, लोणावळा येथे मुक्काम/जेवण.
२५ जानेवारी - दिवस सहावा : लोणावळा ते वाशी
लोणावळाहून सकाळी ८ वाजता निघणार, पनवेल ता, नवी मुंबई येथे दुपारी जेवण, वाशी येथे मुक्काम/जेवण.
२६ जानेवारी - दिवस सातवा: वाशी ते आझाद मैदान-मुंबई
वाशीतून सकाळी ८ वाजता नाष्टा करून निघणार, आझाद मेदान किंवा शिवाजी पार्क मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार.
२६ जानेवारी - आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.