Manoj Jarange : ''पूर्वी आत्या कान भरायची, आता फडणवीस भरतात'' जरांगेंचे फडणवीसांवर आणखी गंभीर आरोप

Manoj Jarange on Devendra Fadnavis : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. जरांगेंनी उपोषणादरम्यान फडणवीसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. फडणवीसांचं राजकारण आणि मराठाद्वेष यावर त्यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर त्यांचे आरोप सुरुच आहेत.
Manoj Jarange
Manoj Jarange esakal
Updated on

Manoj Jarange on Devendra Fadnavis : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. जरांगेंनी उपोषणादरम्यान फडणवीसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. फडणवीसांचं राजकारण आणि मराठाद्वेष यावर त्यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर त्यांचे आरोप सुरुच आहेत.

मनोज जरांगेंनी आता फडणवीसांना आत्येची उपमा देत, ते कसे कान भरतात, यावरुन टीकास्र सोडलं. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, माझी हत्या करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. माझ्या अंगावर कार्यकर्ते घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. शिवाय पोलिसांना हाताशी धरुन कान भरण्यचा उद्योग सुरु आहे.

Manoj Jarange
Netflix March Released 2024 : पुढील दोन आठवड्यांत 'नेटफ्लिक्स' वर मनोरंजनाचा तडका! जाणून घ्या कोणत्या 'सीरीज' येणार भेटीला?

''देवेंद्र फडणवीसांनी एसपींचे कान फुंकले आहेत, पीआय, पीएसआय यांचेही कान फुंकले आहेत. गृहमंत्री हे जबाबदारीचं पद आहे. परंतु ते कान फुंकण्याचं काम करीत आहेत. ग्रामीण भागामध्ये पूर्वी मुल जन्माला आलं की आत्या त्याचे कान फुंकायची. सध्या देवेंद्र फडणवीस हे आत्याच्या भूमिकेत आहेत.'' अशी बोचरी टीका जरांगेंनी केली.

Manoj Jarange
Lok Sabha elections 2024: ओवैसींचा पराभव करणार भाजपची महिला उमेदवार? कोण आहेत माधवी लता?

सरकारला पुढील आंदोलनाचा इशारा देत त्यांनी म्हटलं की, राज्य सरकारने सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली पाहिजे. ८ किंवा ९ तारखेपर्यंत आम्ही त्याची वाट बघू. नाहीतर ते किती दडपशाही करतात, ते बघून घेऊ. माझ्यावर हल्ला करण्याचा डाव रचला जातोय. कार्यकर्त्यांकडून किंवा महिलांच्या अडून हल्ला केला जाऊ शकतो. परंतु मी मागे हटणार नाही, आता बाहेर पडतोय. मीपण बघून घेणार आहे. असं म्हणत जरांगेंनी ९ तारखेपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट बघणार असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.